Winter Season  Agrowon
हवामान

Cold Weather Update : राज्यात गारठा वाढला

Winter Update : उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यात गारठा वाढला आहे. किमान तापमान हंगामात प्रथमच १० अंशांखाली घसरल्याने परभणी, धुळे आणि निफाड येथे हुडहुडी वाढली आहे.

अमोल कुटे

Pune News : उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यात गारठा वाढला आहे. किमान तापमान हंगामात प्रथमच १० अंशांखाली घसरल्याने परभणी, धुळे आणि निफाड येथे हुडहुडी वाढली आहे. आज (ता. २६) किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये हुडहुडी वाढत जाण्याच अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

देशाच्या उत्तरेकडे थंडीचा कडाका वाढू लागला आहे. सोमवारी (ता. २५) उत्तर प्रदेशातील 'सारसवा' येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी १०.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

दरम्यान परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठामध्ये राज्याचे यंदाच्या हंगामातील ९.६ अंश तापमानाची नोंद झाली आहे. धुळे येथील कृषी महाविद्यालय आणि निफाड येथील गहू संशोधन केंद्रात १० अंश तापमानाची नोंद झाली. अनेक ठिकाणी किमान तापमान १३ अंशांपेक्षा खाली आहे. उर्वरीत राज्यात किमान तापमानाचा पारा घसरू लागला आहे.

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३० अंशाच्या खाली आला आहे. कोकण आणि विदर्भात ३० अंशाच्या वर असला तरी कमाल तापमानात घट होत आहे. सोमवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सांताक्रूझ येथे उच्चांकी ३४.१ अंश तापमानाची नोंद झाली. आज (ता. २६) किमान तापमानात घट होत गारठा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

सोमवारी (ता. २५) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे २९.१ (१२.१), अहिल्यानगर २९.० (-), धुळे - (१०.०), जळगाव ३०.० (१२.४), कोल्हापूर २८.६ (१६.७), महाबळेश्वर २४.१ (१२.०), मालेगाव २६.८ (१३.६), नाशिक २८.९ (१२.०), निफाड २७.९ (१०.०), सांगली ३०.० (१५.७), सातारा २९.९ (१३.८), सोलापूर ३२.२ (१५.६), सांताक्रूझ ३४.१ (१९.०), डहाणू ३३.६ (१८.७), रत्नागिरी ३३.४ (२१.१),

छत्रपती संभाजीनगर २९.० (१२.५), धाराशिव - (१५.४), परभणी २८.५(१२.७), परभणी कृषी विद्यापीठ २८.० (९.६), अकोला ३०.६ (१४.०), अमरावती ३१.० (१५.५), बुलढाणा २८.६ (१४.३), ब्रह्मपूरी ३१.२ (१३.१), चंद्रपूर २८.४ (१४.८), गडचिरोली २९.० (१३.४), गोंदिया २८.४ (१२.५), नागपूर ३०.२ (१३.०), वर्धा २९.० (१३.८), वाशीम २९.० (-), यवतमाळ ३०.० (-).

१० अंश व त्यापेक्षा कमी तापमान असलेली ठिकाणे :

परभणी (कृषी) ९.६, धुळे १०, निफाड १०.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT