Weather  Agrowon
हवामान

Maharashtra Temperature Alert: उन्हाचा चटका ठरतोय तापदायक

Weather Forecast: बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे उच्चांकी ३७ अंश तापमानाची नोंद झाली आहे. आज (ता. ६) कमाल आणि किमान तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज आहे.

अमोल कुटे

Pune News: हिवाळा हंगाम अंतिम टप्प्यात आला असतानाच राज्यात उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. अनेक ठिकाणी पारा ३६ अंशांवर पोहोचला असून, उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे उच्चांकी ३७ अंश तापमानाची नोंद झाली आहे. आज (ता. ६) कमाल आणि किमान तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज आहे.

उत्तर गुजरातमधील चक्राकार वारे, तसेच वायव्य राजस्थानमधील चक्राकार वाऱ्यांची स्थिती व त्यापासून आग्नेय अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निवळून गेला आहे. वायव्य भारतात १२.६ किलोमीटर उंचीपर्यंत १५० नॉट्स वेगाने पश्‍चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे प्रवाह कायम आहेत. बुधवारी (ता. ५) पंजाबच्या बठिंडा आणि फरिदकोट येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

राज्यात कमाल तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. बुधवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील अकोला येथे राज्यातील उच्चांकी ३७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ब्रह्मपुरी, वाशीम, सोलापूर, वर्धा, परभणी येथे तापमान ३६ अंशांपार पोहोचले आहे. तापमान ३५ अंशांवर गेल्याने उन्हाचा चटका असह्य होऊ लागला आहे. उकाड्यामुळे वाहणाऱ्या घामाच्या धारा आणखीच त्रासदायक ठरत आहेत.

राज्यात किमान तापमानाचा पारादेखील चढता आहे. बहुतांश ठिकाणी किमान तापमान १५ ते २२ अंशांच्या दरम्यान पोहोचले आहे. बुधवारी (ता. ५) निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी १०.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. ६) उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमानात १ ते २ अंशांची घट होण्याचा, तर उर्वरित राज्यात कमाल आणि किमान तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज कायम आहे.

बुधवारी (ता. ५) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

पुणे---३४.३---१४.२

अहिल्यानगर---३४.२---१६.३

धुळे---३१.६---१३

जळगाव---३२.३---१५.६

जेऊर---३५.५---१५.५

कोल्हापूर---३४.१---१८.९

महाबळेश्वर---२८.६---१५.९

मालेगाव---३३---१६

नाशिक---३१.७---१३.९

निफाड---३१.९---१०.२

सांगली---३४.८---१७.७

सातारा---३४.८---१५.६

सोलापूर---३६.९---१८.६

सांताक्रूझ---३१.७---१७.४

डहाणू---२८---१९

रत्नागिरी---३१.९---१८.१

छत्रपती संभाजीनगर---३३.६---१७.७

धाराशिव---३३.५---१७.

परभणी---३६.१---१८.२

परभणी (कृषी)---३५.५---१४.

अकोला---३७---१९

अमरावती---३५.८---१७.३

भंडारा---३४.८---१७

बुलडाणा---३४.५---१८.६

ब्रह्मपुरी---३६.८---१८.४

चंद्रपूर---३५.८---निरंक

गडचिरोली---३५---१७.२

गोंदिया---३५---१९.८

नागपूर---३५.६---१८

वर्धा---३६.२---१९.५

वाशीम---३६.८---२१.२

यवतमाळ---३५.५---१७.५

३६ अंशांपेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे :

अकोला ३७, ब्रह्मपुरी ३६.८, वाशीम ३६.८, सोलापूर ३६.९, वर्धा ३६.२, परभणी ३६.१.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Update: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा सरी शक्य; उन्हाचा चटका कायम

Ratoon Sugarcane: खोडवा उसावरील एल निनोच्या उष्णतेचा ताण कसा कमी करावा?

Farmers Protest: शेतकरी अडचणीत, ऊस दर, धान खरेदी प्रश्नी राकेश टिकेत आक्रमक, मोठ्या आंदोलनाचा इशारा

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

SCROLL FOR NEXT