Weather Agrowon
हवामान

Maharashtra Weather Update: राज्यात काही भागात ढगाळ हवामानाचा अंदाज; राज्यात उन्हाचा कडाका वाढला; तापमान ३८.६ अंशावर

Weather Forecast: राज्यात उन्हाचा तडाखा वाढत असून, रत्नागिरी येथे आज देशातील सर्वाधिक ३८.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तसेच, किमान तापमानातही वाढ झाल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.

Anil Jadhao 

Pune News: राज्यातील उन्हाचा चटका वाढतच आहेत. रत्नागिरी येथे आज देशातील सर्वाधिक ३८.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. राज्यात सकाळच्या किमान तापमानातही वाढ झाली.

तर राज्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ होण्याची शक्यता आहे. तर तुरळक ठिकाणी पावसाला पोषक हवामान होण्याचा अंदाज आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे. 

उत्तर भारतातही थंडीचा कडाका काहीसा कमी झालेला आहे. देशातील किमान तापमानही वाढले आहे. आज हरियानातील अंबाला येथे देशातील उच्चांकी ८.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर देशातील सर्वाधिक तापमान महाराष्ट्रातील रत्नागिरी येथे होते. रत्नागिरीत आज ३८.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. यामुळे उन्हाचा चटका असह्य होत आहे.

रायलसीमापासून दक्षिण छत्तीसगडपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. देशातील कमाल तापमानात वाढ होत आहे. कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक भागात तापमानात वाढ झाल्याने उन्हाचा चटका वाढला आहे. सांताक्रूझ, सांगली, जेऊर, परभणी, सोलापूर येथे तापमानाचा पारा ३६ अंशाच्या पुढे होते. 

राज्यात किमान आणि कमाल तापमानात वाढ होत आहे. ही वाढ कायम राहण्याचा अंदाज आहे. तर आज दक्षिण महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. राज्यातील तापमानात आणखी होण्याचाही अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Interview with Dada Lad: दादा लाड तंत्रज्ञानाचा देशभर प्रसार व्हावा

Papaya Mealybug Infestation: पपईवरील पिठ्या ढेकणाची वाढती समस्या

Ai in Rural Development: कृत्रिम बुद्धिमत्ता अन् ग्रामीण भारत

FPC Success Story: महिला शेतकरी कंपनीची भरारी !

Soybean Processing Success: सोयाबीन प्रक्रियेतून महिला गटाची प्रगती

SCROLL FOR NEXT