Summer Heat Agrowon
हवामान

Maharashtra Weather Update : राज्यात उन्हाचा तडाखा, विदर्भात उष्णतेची लाट कायम

Heat Wave Alert : सूर्य तळपत असल्याने राज्यात उन्हाचा चटका वाढला आहे. रविवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भात उष्णतेची लाट होती.

अमोल कुटे

Pune News : सूर्य तळपत असल्याने राज्यात उन्हाचा चटका वाढला आहे. रविवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भात उष्णतेची लाट होती. चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

आज (ता. १७) विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाटेचा, तर राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज आहे. बुधवारपासून (ता. १९) विदर्भासह राज्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविला आहे.

रविवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांत ओडिशातील बौध येथे देशातील उच्चांकी ४२.५ अंश तापमानाची नोंद झाली. राज्यात चंद्रपूर पाठोपाठ अकोला आणि वर्धा येथे ४१ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. तसेच ब्रह्मपुरी, अमरावती, सोलापूर, नागपूर, मालेगाव, गडचिरोली येथे तापमान चाळीशीपार होते. कमाल तापमानाचा पारा ४० अंशांपार गेल्याने तसेच तापमानात सरासरीपेक्षा ४.५ अंश व त्यापेक्षा अधिक वाढ झाल्याने अकोला, अमरावती, ब्रह्मपुरी, चंद्रपूर आणि नागपूर येथे उष्णतेची लाट आली होती.

दरम्यान धुळे, परभणी, भंडारा, वाशीम आणि यवतमाळ येथे कमाल तापमान ३९ अंशांपार होते. राज्यात उन्हाच्या चटका आणि उकाडा चांगलाच तापदायक ठरत आहे. रात्रीच्या किमान तापमानात वाढ झाली असून, घामाच्या धारा वाहत आहेत.

आज (ता. १७) विदर्भात तुरळक ठिकाणी उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता आहे. राज्यात पावसाला पोषक हवामान होत असून, बुधवारपासून (ता. १९) विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

रविवारी (ता. १६) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

पुणे---३८.७---१८.२

अहिल्यानगर---निरंक---१७.५

धुळे---३९.५---१५.०

जळगाव---३८.५---२२.५

जेऊर---निरंक---२०.०

कोल्हापूर---३७.१---२३.०

महाबळेश्वर---३२.५---२०.४

मालेगाव---४०.०---२१.६

नाशिक---३६.९---२१.२

निफाड---३७.५---१६.३

सांगली---३७.९---२३.५

सातारा---३७.७---२०.६

सोलापूर---४०.३---२५.१

सांताक्रूझ---३५.१---२१.९

डहाणू---३३.३---२१.२

रत्नागिरी---३२.९---२४.५

छत्रपती संभाजीनगर---३८.४---२३.०

धाराशिव---३८.०---२१.२

परभणी---३९.०---२४.०

परभणी (कृषी)---३८.०---२०.१

अकोला---४१.३---२३.९

अमरावती---४०.४---२२.१

भंडारा---३९.४---२१.६

बुलडाणा---३७.६---२४.६

ब्रह्मपुरी---४०.८---२२.०

चंद्रपूर---४२.०---निरंक

गडचिरोली---४०.०---२०.०

गोंदिया---३८.८---२२.०

नागपूर---४०.२---२३.०

वर्धा---४१.०---२४.०

वाशीम---३९.८---निरंक

यवतमाळ---३९.८---२२.२

सरासरी तापमान (अंश से.)

विभाग---किमान---कमाल

विदर्भ---२०.०---४२.०

मराठवाडा---२०.१---३९.०

पश्‍चिम महाराष्ट्र---१८.२---४०.३

उत्तर महाराष्ट्र---१५.०---४०.०

कोकण---२१.२---३५.१

४० अंशापेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे :

चंद्रपूर ४२, अकोला ४१.३, वर्धा ४१, ब्रह्मपुरी ४०.८, अमरावती ४०.४, सोलापूर ४०.३, नागपूर ४०.२, मालेगाव ४०, गडचिरोली ४०.

उष्णतेची लाट असलेले ठिकाणे :

अकोला, अमरावती, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, नागपूर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Shortage Issue: वरकुटे खुर्द, सराफवाडी पाझर तलाव कोरडा

20th Bhimthadi Jatra: पुण्यात १६ डिसेंबरपासून २० वी भीमथडी जत्रा

PDCC Bank Support: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्व पातळ्यांवर पुढाकार: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

Agriculture Officer Suspended: चुकीच्या मूल्यांकनप्रकरणी कृषी अधिकारी निलंबित

Bharati Plant: जुन्नरमध्ये दुर्लक्षित वनस्पतीला ‘भारती’ नावाने मिळाली ओळख

SCROLL FOR NEXT