Summer Heat Agrowon
हवामान

Maharashtra Weather Update : उन्हाचा चटका, उकाड्यात वाढ शक्य

Summer Heat : वादळी पावसाचे ढग दूर झाल्याने राज्यात उन्हाची ताप पुन्हा वाढू लागली आहे. आजपासून (ता. २४) राज्यात उन्हाच्या चटका आणखी वाढण्याचा अंदाज आहे.

अमोल कुटे

Pune News : वादळी पावसाचे ढग दूर झाल्याने राज्यात उन्हाची ताप पुन्हा वाढू लागली आहे. आजपासून (ता. २४) राज्यात उन्हाच्या चटका आणखी वाढण्याचा अंदाज आहे. दक्षिण महाराष्ट्रात आकाश ढगाळ राहून उकाड्यात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

पश्चिम विदर्भापासून दक्षिण तामिळनाडू पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यातच बंगालच्या उपसागरात केंद्र भागाकडून बाहेरच्या दिशेने वारे फिरणारी प्रणाली (एन्टी सायक्लोन) असल्याने पूर्व भारतातील राज्ये आणि पूर्व किनाऱ्यावर वाऱ्यांचा संगम होत आहे.

रविवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांत बुलढाणा आणि ब्रह्मपूरी येथे राज्यातील उच्चांकी ३९.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अकोला आणि जेऊर येथे तापमान ३९ अंशांच्या वर होते.

मालेगाव, सोलापूर, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळ येथे ३८ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. राज्यात ढगाळ हवामान होत असल्याने उकाडा कायम आहे. आज (ता. २४) राज्यात उन्हाचा चटका, उकाडा वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

रविवारी (ता. २३) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

पुणे---३६.६---१७.२

अहिल्यानगर---निरंक---१५.७

धुळे---३६.५---१५.६

जळगाव---३७.७---१७.०

जेऊर---३९.०---१७.५

कोल्हापूर---३७.१---२१.०

महाबळेश्वर---३१.८---१९.५

मालेगाव---३८.२---१८.२

नाशिक---३५.३---१६.४

निफाड---३५.७---१२.०

सांगली---३७.४---२१.२

सातारा---३६.७---१८.४

सोलापूर---३८.८---२३.०

सांताक्रूझ---३३.५---२३.२

डहाणू---३३.९---२०.६

रत्नागिरी---३३.०---२१.६

छत्रपती संभाजीनगर---३६.८---१८.८

धाराशिव---३७.२---२०.८

परभणी---३७.८---२१.०

परभणी (कृषी)---३७.३---१८.४

अकोला---३९.१---२०.१

अमरावती---३८.४---१९.७

भंडारा---३८.०---२३.४

बुलढाणा---३९.३---२४.३

ब्रह्मपूरी---३९.३---२४.३

चंद्रपूर---३८.०---निरंक

गडचिरोली---३६.२---२१.०

गोंदिया---३५.४---२२.५

नागपूर---३७.६---२१.४

वर्धा---३८.४---२०.६

वाशीम---३७.८---निरंक

यवतमाळ---३८.०---१९.४

सरासरी तापमान (अंश से.)

विभाग---किमान---कमाल

विदर्भ---१९.४---३९.३

मराठवाडा---१८.४---३७.८

पश्‍चिम महाराष्ट्र---१५.४---३८.८

उत्तर महाराष्ट्र---१०.२---३७.०

कोकण---२०.६---३३.९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

Crop Insurance Scheme: नांदेडमध्ये पीकविमा योजनेत ९ लाखांहून अधिक अर्ज

Irrigation Projects : रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

SCROLL FOR NEXT