Weather Agrowon
हवामान

Maharashtra Weather Update: उन्हाचा पारा चढला! कोकणासह राज्यभर चटका वाढला

Weather Forecast: कोकणात तापमानाचा पारा ३८ अंशांपार पोचल्याने उष्णतेची लाट आहे. बुधवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सांताक्रुझ येथे ३८.७ अंश तापमान नोंदले गेले.

अमोल कुटे

Pune News: कोकणात तापमानाचा पारा ३८ अंशांपार पोचल्याने उष्णतेची लाट आहे. बुधवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सांताक्रुझ येथे ३८.७ अंश तापमान नोंदले गेले. कमाल तापमानात चढ-उतार होण्याचे संकेत असल्याने आज (ता. २७) कोकणात उष्ण व दमट हवामानाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आहे. उर्वरित राज्यातही उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

देशातील कमाल तापमानात वाढ झाल्याने बुधवारी (ता. २६) केरळातील कन्नूर येथे देशातील उच्चांकी ३९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर कोकणातील सांताक्रूझसह डहाणू ३८.१ अंश, तसेच रत्नागिरी , ब्रह्मपुरी, अकोला, यवतमाळ, सोलापूर येथे ३६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. किनारपट्टीय भागात कमाल तापमानात सरासरीपेक्षा ४.५ अंशांची वाढ झाली किंवा तापमान ३७.५ अंशांच्या पुढे गेले तर उष्णतेची लाट आली असे समजले जाते. त्यानुसार कोकणात बहुतांश ठिकाणी उष्णतेची लाट होती.

उन्हाचा चटका वाढल्याने दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे तापदायक ठरत आहे. उकाड्याने घामाच्या धारा वाढल्या आहेत. उत्तर महाराष्ट्रासह पहाटे काहीसा थंडावा कायम आहे. बुधवारी (ता. २६) निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी ११.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. २७) कोकणातील ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात उष्ण व दमट हवामानाचा इशारा (येलो अलर्ट) कायम आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

बुधवारी (ता. २६) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

पुणे---३५.०---१५.४

अहिल्यानगर---३४.९---१४.४

धुळे---३४.०---१२.०

जळगाव---३३.८---१६.०

जेऊर---३४.५---१६.०

कोल्हापूर---३१.७---१९.७

महाबळेश्वर---२९.४---१७.२

मालेगाव---३३.६---१६.२

नाशिक---३३.४---१५.४

निफाड---३१.८---११.५

सांगली---३४.२---१९.१

सातारा---३४.७---१७.२

सोलापूर---३६.०---२१.४

सांताक्रूझ---३८.७---२१.०

डहाणू---३८.१---२०.२

रत्नागिरी---३७.०---२१.७

छत्रपती संभाजीनगर---३४.४---१७.८

धाराशिव---३४.१---१८.८

परभणी---३४.४---१७.५

परभणी (कृषी)---३४.०---१४.०

अकोला---३६.३---१८.६

अमरावती---३४.४---१८.९

भंडारा---३३.६---१८.२

बुलडाणा---३५.०---१८.८

ब्रह्मपुरी---३७.०---१६.०

चंद्रपूर---३४.६---निरंक

गडचिरोली---३४.२---१६.०

गोंदिया---३२.६---१५.६

नागपूर---३३.६---१६.८

वर्धा---३३.९---१७.०

वाशीम---३४.४---निरंक

यवतमाळ---३६.२---१९.२

सरासरी तापमान (अंश से.)

विभाग---किमान---कमाल

विदर्भ---१५.६---३७

मराठवाडा---१४.०---३४.४

पश्‍चिम महाराष्ट्र---१५.४---३६

उत्तर महाराष्ट्र---११.५---३४.९

कोकण---२०.२---३८.७

उष्ण व दमट हवामानाचा इशारा (येलो अलर्ट) :

ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

३६ अंशापेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे :

सांताक्रूझ ३८.७, डहाणू ३८.१, रत्नागिरी ३७, ब्रह्मपुरी ३७, अकोला ३६.३, यवतमाळ ३६.२, सोलापूर ३६.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Update: माॅन्सून गोव्यात दाखल; माॅन्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक हवामान

Agriculture Workshop: सघन कापूस लागवडीवर केळीवेळी येथे मार्गदर्शन

Jalyukt Shivar Abhiyan: 'एल निनो'चं संकट; 'जलयुक्त शिवार'साठी १७० कोटी निधी, प्रत्येक जिल्ह्याला मिळणार ५ कोटी

Fertilizer Shop License Suspension: अकोला जिल्ह्यात सात कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द

Fertilizer Complaints Helpline: खतविषयक तक्रार निवारणासाठी तालुकानिहाय हेल्पलाइन सुविधा

SCROLL FOR NEXT