Temperature Agrowon
हवामान

Maharashtra Temperature: कमाल, किमान तापमानात वाढ शक्य

Maharashtra Winter Weather: राज्यात उन्हाची तीव्रता कमी अधिक होत आहे. थंडी कमी झाली असून, उन्हाचा चटका, उकाडा तापदायक ठरत आहे. शुक्रवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे उच्चांकी ३७.२ अंश तापमानाची नोंद झाली आहे.

अमोल कुटे

Pune News: राज्यात उन्हाची तीव्रता कमी अधिक होत आहे. थंडी कमी झाली असून, उन्हाचा चटका, उकाडा तापदायक ठरत आहे. शुक्रवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे उच्चांकी ३७.२ अंश तापमानाची नोंद झाली आहे. आज (ता. ८) कमाल आणि किमान तापमानातील वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

वायव्य भारतात १२.६ किलोमीटर उंचीपर्यंत १४० नॉट्स वेगाने पश्चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे प्रवाह कायम आहेत. वायव्य भारतात थंडीचा कडाका पुन्हा वाढला असून, शुक्रवारी (ता. ७) राजस्थानच्या फतेहपूर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी २.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

तर राज्यात धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी १०.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात बुहतांश ठिकाणी किमान तापमानाचा पारा १४ ते २१ अंशांच्या दरम्यान आहे.

राज्यात थंडी कमी झाली असून, कमाल तापमान कमी-अधिक होत आहे. शुक्रवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरीसह सोलापूर आणि परभणी येथे तापमान ३५ अंशांपार आहे. अनेक ठिकाणी तापमान ३३ अंशांच्या पुढे आहे. राज्यात उन्हाच्या चटक्याने घामाच्या धारा वाहत आहेत. आज (ता. ८) राज्यात कमाल आणि किमान तापमानातील वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

शुक्रवारी (ता. ७) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

पुणे---३३.१---१६.४

अहिल्यानगर---३२.९---१७.३

धुळे---२८.५---१०.५

जळगाव---३४.०---१७.०

जेऊर---निरंक---१६.५

कोल्हापूर---३३.५---१९.५

महाबळेश्वर---२९.७---१७.५

मालेगाव---निरंक---१५.६

नाशिक---३०.१---१४.६

निफाड---२९.५---१३.८

सांगली---३४.०---१८.१

सातारा---३४.४---१७.३

सोलापूर---३५.९---२२.२

सांताक्रूझ---३४.४---२१.५

डहाणू---२८.०---१८.०

रत्नागिरी---३३.६---२०.१

छत्रपती संभाजीनगर---३१.८---१७.४

धाराशिव---निरंक---१८.०

परभणी---३५.०---१८.५

परभणी (कृषी)---३२.६---१५.७

अकोला---३२.६---१८.०

अमरावती---३२.४---१७.३

भंडारा---२८.६---१६.०

बुलडाणा---३०.६---१७.०

ब्रह्मपुरी---३७.२---१५.४

चंद्रपूर---३४.०---निरंक

गडचिरोली---३३.६---१७.२

गोंदिया---२९.२---१७.४

नागपूर---३०.८---१७.४

वर्धा---३१.०---१६.५

वाशीम---३४.०---१९.८

यवतमाळ---३०.६---१६.८

३५ अंशांपेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे :

ब्रह्मपुरी ३७.२, सोलापूर ३५.९, परभणी ३५.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fake Agriculture Input: बनावट निविष्ठांचे जाळे राज्यांच्या सीमापार

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवरील आंदोलन आणि सप्तपर्णीची अ‍ॅलर्जी

Fake Pesticide Issue: बनावट कीडनाशके : हवी सक्षम यंत्रणा

Tissue Culture Lab Scheme: उती संवर्धन प्रयोगशाळेसाठी अर्जाची संधी

Agriculture Services Reform: कृषी विभागाच्या अकरा सेवांचे डिजिटल सुसूत्रीकरण

SCROLL FOR NEXT