Weather Agrowon
हवामान

Heatwave in Maharashtra: मध्य महाराष्ट्र, विदर्भात उन्हाचा चटका वाढला; तापमान ३६ अंशांच्या वर

Maharashtra Weather Update: राज्यात थंडी ओसरताच उन्हाचा जोर वाढला असून मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तापमान ३६ अंशांच्या वर गेले आहे. सोलापूरमध्ये गुरुवारी ३८ अंश तापमानाची नोंद झाली असून, पुढील काळात तापमान वाढण्याची शक्यता आहे.

अमोल कुटे

Pune News: राज्यात थंडी कमी झाल्यानंतर उन्हाची ताप वाढू लागला आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उन्हाचा चटका अधिक असल्याने तापमानाचा पारा ३६ अंशांच्या वर गेला आहे. गुरुवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे ३८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शनिवारपासून (ता. २२) राज्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात ढगाळ हवामान होण्याची शक्यता आहे.

राजस्थान आणि परिसरावरील चक्राकार वारे निवळून गेले आहे. देशातील कमाल तापमानात हळूहळू वाढ होऊ लागली आहे. गुरुवारी (ता. २०) आंध्र प्रदेशातील अनंतपूर येथे देशातील उच्चांकी ३८.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सोलापूर येथे ३८ अंश तापमान नोंदले गेले. दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उन्हाचा चटका अधिक आहे. जेऊर, सांगली, ब्रह्मपुरी, अकोला, चंद्रपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ येथे पारा ३६ अंशांच्या पार गेला आहे.

उत्तर महाराष्ट्रात मात्र गारठा कायम असून, गुरुवारी (ता. २०) निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी १० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उन्हाच्या झळा चांगल्याच वाढल्या असून, उकाड्यातही वाढ झाली आहे. आज (ता. २१) उत्तर महाराष्ट्राच्या किमान तापमानात १ ते २ अंशांची घट होण्याची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात वाढलेले तापमानात कायम राहण्याचा, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये उद्यापासून ढगाळ हवामान होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

गुरुवारी (ता. २०) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

पुणे---३५.८---१४.७ अहिल्यानगर---निरंक---१४.५ धुळे---३४.०---११.८ जळगाव---३४.०---१३.७ जेऊर---३७.२---१६.० कोल्हापूर---३५.१---२०.६ महाबळेश्वर---३०.७---१६.६ मालेगाव---३४.२---१६.६ नाशिक---३४.३---१४.६ निफाड---३२.८---१०.० सांगली---३६.६---२०.० सातारा---३५.३---१७.१ सोलापूर---३८.०---२०.२

सांताक्रूझ---३४.१---२०.० डहाणू---३०.७---१९.० रत्नागिरी---३२.३---१९.१ छत्रपती संभाजीनगर---३४.४---१८.० धाराशिव---३४.६---१९.० परभणी---३५.९---१८.४ परभणी (कृषी)---३४.७---१३.४ अकोला---३६.८---१८.० अमरावती---३६.२---१६.३ भंडारा---३५.०---१८.२ बुलडाणा---३३.८---२०.८ ब्रह्मपुरी---३७.६---१८.२ चंद्रपूर---३६.८---निरंक गडचिरोली---३५.४---१६.० गोंदिया---३४.४---१७.८ नागपूर---३४.९---१७.६ वर्धा---३६.४---१९.२ वाशीम---३५.८---निरंक यवतमाळ---३६.२---१६.८

३६ अंशापेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे :

सोलापूर ३८, ब्रह्मपुरी ३७.६, जेऊर ३७.२, अकोला ३६.८, चंद्रपूर ३६.८, सांगली ३६.६, वर्धा ३६.४, अमरावती ३६.२, यवतमाळ ३६.२. ----

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Double Income : भाजपचा स्वभावच शेतकरीविरोधी; अखिलेश यादवांची शेतकरी प्रश्नांवरून टीका

Manoj Jarange Patil: 'मरण आलं तरी चालेल...'; मनोज जरांगे अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघाले

Marathwada Water Project: मराठवाड्याचा पाणीप्रश्न ऐरणीवर

Mushroom Farming Success Story: अथक प्रयत्नांमधून मशरूमला तयार केले मार्केट

Maratha Protest: मुंबईला आंदोलनासाठी एकटाच जाणार : जरांगे

SCROLL FOR NEXT