Rain Alert Agrowon
हवामान

Monsoon Weather Alert: पुण्याच्या घाटमाथ्यावर ‘रेड अलर्ट’

Pune Red Alert: आज (ता. ६) पुण्याच्या घाटमाथ्यावर मुसळधारेचा अंदाज असल्याने सावधगिरीचा इशारा (रेड अलर्ट), तर कोकण, घाटमाथ्यासह जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे.

अमोल कुटे

Pune News: मॉन्सून सक्रिय पोषक हवामान झाल्याने कोकण, घाटमाथ्यासह राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आज (ता. ६) पुण्याच्या घाटमाथ्यावर मुसळधारेचा अंदाज असल्याने सावधगिरीचा इशारा (रेड अलर्ट), तर कोकण, घाटमाथ्यासह जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे.

उर्वरित कोकण, विदर्भात, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार सरींची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सर्वसाधारण स्थितीवर गंगानगरपासून भिवानी, आग्रा, बांदा, देहरी, पुरुलिया कोलकता ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे.

पश्चिम बंगाल आणि परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे आज (ता. ६) उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. ईशान्य अरबी समुद्रापासून पश्चिम बंगालमधील चक्राकार वाऱ्यांपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. दक्षिण गुजरात आणि कर्नाटक किनारपट्टीला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम असल्याने काही ठिकाणी अतिवृष्टीची नोंद होत आहे. शनिवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ताम्हिणी येथे सर्वाधिक १७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोकणासह घाटमाथ्यावर काही ठिकाणी १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा शिडकावा होत आहे. शनिवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये परभणी येथे राज्यातील उच्चांकी ३४ अंश तापमानाची नोंद झाली.

आज (ता. ६) पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. तर मुंबई, नंदूरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, भंडारा, गोंदिया गडचिरोली जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता असल्याने, तसेच विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

शनिवारी (ता. ५) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
‎ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान
‎पुणे---२९.७---२२.७
अहिल्यानगर---३०.८---२३.४
‎‎धुळे---३२.०---२१.०
जळगाव---३०.६---२३.२
जेऊर---३१.५---२०.०
‎‎कोल्हापूर---२५.५---२२.२
‎महाबळेश्‍वर---१९.६---१८.०
मालेगाव---३०.८---२२.६

‎‎नाशिक---२७.०---२२.८
‎निफाड---२९.६---२२.५
‎सांगली---२८.०---२२.५
‎सातारा---२६.२---२२.२
‎सोलापूर---३१.७---२४.०
‎सांताक्रूझ---३०.९---२५.२
डहाणू---३०.०---२४.०
‎रत्नागिरी---२८.५---२४.६
‎छत्रपती संभाजीनगर---२९.८---२३.५

‎धाराशिव---३०.२---२१.४
‎परभणी---३४.०---२३.६
परभणी (कृषी)---३२.५---२३.०
‎‎अकोला---३०.३---२४.६
अमरावती---२८.२---२२.७
‎भंडारा---२८.०---२४.०‎‎
बुलडाणा---२८.०---२२.४
‎ब्रह्मपुरी---२९.७---२३.८
‎चंद्रपूर---३०.६---२३.८

‎गडचिरोली---२८.६---२३.६
‎गोंदिया---२७.६---२३.६
‎नागपूर---२८.६---२३.६
‎वर्धा---२८.२---२४.५
‎वाशीम---२९.६---२२.६
‎यवतमाळ---२८.६---२३.०

मुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) : पुणे घाटमाथा.

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) : पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : मुंबई, नंदूरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, वर्धा, नागपूर, चंद्रपूर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Machinery : महिला बचत गटांना ‘कृषी अवजारे बँके’ची सुवर्णसंधी

Akola Drought Update : अकोला जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा : गवळी

Jambatanda Storage Tank : जांबतांडा साठवण तलावासाठी प्रशासनाकडून हालचाली

Sangli Rainfall : सांगलीत ऑगस्टच्या पहिल्या २१ दिवसांत ५१ टक्के पाऊस

Water Security : नियोजनातून जलसुरक्षेचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न : डॉ. गेडाम

SCROLL FOR NEXT