Rain Agrowon
हवामान

Paus Andaj : राज्यात ३ दिवस पावसाचे वातावरण; अनेक जिल्ह्यात पावसाची शक्यता!

Rain Forecast : हवामान विभागाने पुढील ३ दिवस राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज दिला.

Anil Jadhao 

Pune News : राज्याच्या काही भागात मागील ५ दिवसांपासून पाऊस हजेरी लावत आहे. तर दुसरीकडे दुपारी उन्हाचा चटकाही जाणवत आहे. हवामान विभागाने पुढील ३ दिवस राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज दिला. 

हवामान विभागाने आज आणि उद्या राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेश आणि विदर्भातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला. पावसावेळी विजा आणि ढगांचा गडगडाटही राहू शकतो, असेही हवामान विभागाने म्हटले आहे. कोल्हापूर, सातारा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पावसाचा जोर काहीसा अधिक राहील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.

गुरुवारपासून राज्यातील काही भागात पावसाचे प्रमाण कमी होण्याचा अंदाज आहे. गुरुवारी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातही काहणी भागात विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

बुधवारी कोकण, महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसह मराठवाड्यातील बीड आणि लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. तर गुरुवारी दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये पावसाची उघडीप राहील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT