Rain Forecast Agrowon
हवामान

Monsoon Rain : राज्यात पावसाचे वातावरण कायम; देशातील काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा कायम

Weather Update : राज्यात पुढील ५ दिवस काही ठिकाणी वादळी पाऊस तर काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला.

Anil Jadhao 

Pune News : माॅन्सून अंदमानात दाखल झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या नजरा माॅन्सूनच्या पावसाकडे लागल्या आहेत. मात्र राज्यात मागील १० ते १२ दिवसांपासून वेगवेगळ्या भागात पाऊस पडत आहे. तर देशातील काही भागात उष्णतेची लाट कायम आहे. राज्यात पुढील ५ दिवस काही ठिकाणी वादळी पाऊस तर काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला. 

माॅन्सूनने दक्षिण बंगालचा उपसागर, निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्रात प्रगती केली आहे. तर अंदमानात दाखल झालेला मॉन्सून यंदा ३१ मेपर्यंत केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. पण पूर्व मोसमी पावसाने राज्याला चांगलाच दणका दिला. मागील १० ते १२ दिवसांपासून राज्याच्या वेगवेगळ्या भागात वादळी पाऊस होत आहे. हवामान विभागाने आणखी पुढील ५ दिवस राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज दिला. 

हवामान विभागाने आज विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडणा आणि वाशीम तर मराठवाड्यातील जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव, तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नगर आणि नाशिक जिल्ह्यात तर कोकणातील सिंधूदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

उद्या म्हणजेच मंगळवारीही विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ आणि वाशीम तर मराठवाड्यातील जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव, तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नगर आणि नाशिक जिल्ह्यात तर कोकणातील सिंधूदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. बुधवारी आणि गुरुवारीही मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

देशातील काही भागात उष्णतेच्या लाटेचाही इशारा हवामान विभागाने दिला. ईशान्य भारत, उत्तर मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यातील काही भागात पुढील ५ दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला. तसेच बंगालच्या उपसागराच्या नैऋत्य भागात २२ मेच्या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र निर्मिती होण्याची शक्यता आहे. तर या कमी दाब क्षेत्राची वाटचाल नैऋत्येकडे होण्याची शक्यता असून २४ मे च्या दरम्यान बंगाल उपसागराच्या मध्यात याचे रुपांतर डिप्रेशनमध्ये होण्याची शक्यता आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation: कोकणातील १ लाख ३४ हजार शेतकऱ्यांना दिलासा; २०९ कोटी मदत मंजूर, शासन निर्णय जारी

Nashik Rain Update: नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी

Paddy Sowing: भात पेरणीची घाई करू नका

Palghar Rain Update: पावसाच्या प्रतीक्षेला अखेर विराम

Tur MSP Procurement: शेतकऱ्यांकडून तुरीची हमीभावापेक्षा कमी दरात खुल्या बाजारात विक्री?; पणनमंत्र्यांकडून महत्त्वाचा खुलासा

SCROLL FOR NEXT