Maharashtra Rain Agrowon
हवामान

Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा जोर वाढणार; कोकण, घाटमाथ्यावर ‘ऑरेंज अलर्ट’

Rain Forecast: पावसाला पोषक हवामान झाल्याने राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आज (ता. ५) कोकण, घाटमाथ्यासह पावसाचा जोर राहणार असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे.

अमोल कुटे

Pune News: पावसाला पोषक हवामान झाल्याने राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आज (ता. ५) कोकण, घाटमाथ्यासह पावसाचा जोर राहणार असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित कोकण, विदर्भात, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार सरींची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा त्याच्या सर्वसाधारण स्थितीवर असून, बिकानेरपासून जयपूर, दातीया, असनसोल, कोलकाता ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. ईशान्य मध्य प्रदेश आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. उत्तर गुजरातपासून पश्‍चिम बंगालपर्यंत आणखी एक कमी दाबाचा पट्टा कायम आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक किनारपट्टीला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर कमी अधिक होत असला तरी तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. शुक्रवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सावंतवाडी येथे सर्वाधिक १३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोकणासह घाटमाथ्यावर काही ठिकाणी १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. उर्वरित राज्यात मुख्यतः उघडिपीसह हलक्या पावसाचा शिडकावा झाला. शुक्रवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे राज्यातील उच्चांकी ३२.९ अंश तापमानाची नोंद झाली.

आज (ता. ५) रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे, मुंबई, नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता असल्याने, तसेच उर्वरित विदर्भासह उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

शुक्रवारी (ता. ४) सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

‎‎ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

‎पुणे---२८.४---२२.५

अहिल्यानगर---२९.८---२३.४

‎‎धुळे---३२.०---२१.०

जळगाव---३२.८---२३.६

जेऊर---३०.५---२०.५

‎‎कोल्हापूर---२५.४---२१.९

‎महाबळेश्‍वर---१९.४---१८.१

मालेगाव---२९.८---२२.६

‎‎नाशिक---२७.६---२२.६

‎निफाड---२९.५---२२.४

‎सांगली---२७.१---२२.१

‎सातारा---२६.७---२२.२

‎सोलापूर---३१.३---२४.१

‎सांताक्रूझ---२९.७---२५.४

डहाणू---३१.५---२५.६

‎रत्नागिरी---२८.४---२४.६

छत्रपती संभाजीनगर---२९.६---२३.६

‎धाराशिव---२९.१---२१.४

‎परभणी---३२.१---२३.८

परभणी (कृषी)---३२.१---२३.८

‎‎अकोला---३२.९---२५.४

अमरावती---३१.२---२२.६

‎भंडारा---२९.४---२२.०‎‎

बुलडाणा---२८.८---२२.४

‎ब्रह्मपुरी---२९.९---२४.०

‎चंद्रपूर---३२.०---२३.६

‎गडचिरोली---२८.०---२३.०

‎गोंदिया---२८.६---२४.०

‎नागपूर---३१.४---२४.०

‎वर्धा---३१.५---२४.६

‎वाशीम---३०.४---२२.८

‎यवतमाळ---२९.४---२३.०

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

पालघर, ठाणे, मुंबई, नागपूर, भंडारा, गोंदिया.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT