Maharashtra Rain Agrowon
हवामान

Monsoon Rain: मंगळवारपासून पावसाचा जोर वाढणार; कोकणातील पावसाचा जोर कायम राहणार

Maharashtra Rain Update: राज्यातील काही भागात मागील ३ दिवसांपासून जोरदार पाऊस हजेरी लावत आहे. मात्र, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात पाऊस कमीच आहे.

Anil Jadhao 

Pune News: राज्यातील काही भागात मागील ३ दिवसांपासून जोरदार पाऊस हजेरी लावत आहे. मात्र, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात पाऊस कमीच आहे. हवामान विभागाने पुढील ५ दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर मंगळवारपासून विदर्भातही पावसाला सुरुवात होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर पुढील ५ दिवस काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली. त्यातही घाटमाथ्यावरील पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे. मात्र, आज, उद्या आणि सोमवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर कमीच राहण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडू शकतात, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

मंगळवारपासून विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये मंगळवारी आणि बुधवारी काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. मराठवाड्यातील विदर्भालगतच्या जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यताही वर्तविण्यात आली. 

माॅन्सूनने देशाचा अगदी थोडा भाग व्यापायचा बाकी आहे. मात्र, आज दुसऱ्या दिवशीही माॅन्सून एकाच जागेवर होता. माॅन्सूनची सिमा आजही जैसलमेर, बिकानेर, झूनझूनू, भारतपूर, रामपूर, सोनिपत आणि अनुपनगर भागात होती. माॅन्सूनच्या वाटचालीसाठीही पोषक हवामान आहे. त्यामुळे माॅन्सूनने आज पंजाब, हरियाना आणि राजस्थानच्या आणखी काही भागात प्रगती केली. माॅन्सून पुढील २ दिवसांमध्ये देशाचा उरलेला भाग व्यापून पूर्ण देश काबीज करेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fake Fertilizers Factory: बनावट खत निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त

Betel Leaf Heatwave Impact: खाऊच्या पानमळ्यांना वाढत्या उष्णतेची झळ

Kabuli Chana Price: काबुली हरभऱ्याला सरासरी ९००० रुपये प्रति क्विंटल दर

FPC Fund Irregularities: कृषी आयुक्तालयाकडून ठाकरेंच्या निलंबनाची शिफारस

Poultry Farming Challenges : कोंबडी खत लाभदायी; लिटर मात्र तापदायी

SCROLL FOR NEXT