Monsoon Update
Monsoon Update Agrowon
हवामान

Monsoon Rain Update: जूनमध्ये सरासरी ओलांडली, मात्र वितरण असमान

अमोल कुटे

Pune News : पूर्वमोसमी पावसाची हजेरी, मॉन्सून दाखल झाल्यानंतर पावसात पडलेला खंड आणि अखेरच्या काळात वाढलेला जोर यामुळे यंदाच्या जून महिन्यात राज्यात २११.३ मिलिमीटर म्हणजेच सरासरीच्या १ टक्का अधिक पाऊस झाला. पावसाने सरासरी ओलांडली असली तरी वितरण असमान असल्याचे दिसून आले.

विदर्भ आणि कोकणात सरासरी गाठणाऱ्या पावसाने, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिण भागात मात्र जोरदार हजेरी लावली आहे. राज्याच्या काही भागांत अद्यापही समाधानकारक पाऊस झाला नसून, जुलै महिन्यात जोरदार पावसाची आवश्यकता आहे.

जून महिन्यात राज्यात सरासरी २०९.८ मिलिमीटर पाऊस पडतो. गतवर्षी जूनमध्ये पावसात मोठा खंड होता, महिनाअखेर राज्यात अवघा ११३.४ मिलिमीटर म्हणजेच सरासरीच्या ५४ टक्के पाऊस पडला होता. यंदा मात्र पावसाची स्थिती चांगली असल्याचे दिसून आले आहे.

राज्याच्या प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही अद्याप पावसाने समाधानकारक जोर धरलेला नाही. महिना अखेरीस कोकण, घाटमाथा आणि पूर्व विदर्भात पावसाच्या जोर वाढल्याचे दिसून आले. जून महिन्याभरात ढगाळ हवामानात ऊन-सावल्यांचा खेळ सुरू असल्याने उन्हाचा चटका आणि असह्य उकाडा त्रासदायक ठरला.

वेळेआधी मॉन्सूनचे आगमन, राज्य व्यापण्यास उशीर

नैॡत्य मोसमी वाऱ्यांचे (मॉन्सून) आगमन यंदा लवकर झाले. केरळमध्ये दीर्घकालीन सर्वसाधारण वेळेच्या दोन दिवस अगोदर (३० मे) मॉन्सून दाखल झाला. अरबी समुद्रावरून मॉन्सूनचा प्रवास अधिक वेगाने झाल्याने केरळ पाठोपाठ महाराष्ट्रात मोसमी वारे चार दिवस अगोदर म्हणजेच ६ जून रोजी डेरेदाखल झाले.

त्यानंतर वेगाने वाटचाल करत १२ जूनपर्यंत वाऱ्यांनी संपूर्ण कोकण, मराठवाड्यासह, मध्य महाराष्ट्राचा बहुतांश भाग व्यापला. त्यानंतर आठ दिवस मॉन्सूनची प्रगती थांबली होती. २० जून रोजी पुन्हा वाटचाल करणाऱ्या मॉन्सूनने २३ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. राज्यात वेळेआधी दाखल झालेल्या मॉन्सूनने राज्य व्यापण्यास आठ दिवसांचा उशीर केला. २ जुलै रोजी मॉन्सूनने संपूर्ण देश व्यापला आहे.

जून महिन्यात पोषक प्रणालींची अभाव असल्याने मॉन्सून दाखल झाल्यानंतरही पावसात खंड पडल्याचे दिसून आले. महिन्याभरात बंगालच्या उपसागरात फक्त एकच कमी दाब क्षेत्र तयार झाले. ही प्रणाली केवळ तीन दिवस सक्रिय होती. दोन्ही समुद्रांत मिळून जूनमध्ये सर्वसाधारण तीन प्रणाली तयार होतात व त्या सरासरी ११ दिवसांपर्यंत सक्रिय असतात. अरबी समुद्रातून मात्र मॉन्सून सक्रिय असला, तरी पावसात खंड पडल्याचे दिसून आले. महिना अखेरीस अनेक भागांत पाऊस सक्रिय झाला.

विदर्भात कशीबशी सरासरी गाठली

मॉन्सून दाखल झाल्यानंतर पावसात खंड पडल्याने विभागवार पावसाच्या वितरणावर परिणाम झाला. विदर्भात पावसाने प्रतीक्षा करायला लावली, मात्र अखेरच्या टप्प्यात झालेल्या पावसाने विदर्भात कशीबशी सरासरी गाठली आहे. विदर्भात सरासरीच्या तुलनेत उणे १६ टक्के पाऊस झाला. कोकण व गोवा विभागांत १ टक्का अधिक, मध्य महाराष्ट्रात १० टक्के अधिक, तर मराठवाडा विभागात १८ टक्के अधिक पावसाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या नोंदीवरून स्पष्ट होत आहे.

जून अखेरपर्यंत राज्यात विभागनिहाय पडलेला पाऊस

विभाग---सरासरी (मिमी)---पडलेला (मिमी)---तफावत (टक्के)

कोकण, गोवा---७०१.५---७०७.४---अधिक १

मध्य महाराष्ट्र---१५७.७---१५९.६---अधिक १०

मराठवाडा---१३४.७---१५९.६---अधिक १८

विदर्भ---१७५.४---१४६.६---उणे १६

सोलापूर, धाराशिवमध्ये सर्वाधिक हिंगोलीमध्ये पावसात मोठी तूट

जून महिन्यात पावसाचे वितरण असमान असले, तरी पूर्वमोसमी पाऊस आणि मृग नक्षत्रामध्ये वरुणराज दमदार बरसल्याने राज्याच्या अनेक जिल्ह्यांत दमदार पावसाने हजेरी लावली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात चांगल्या पावसाने हजेरी लावली आहे. लेट खरीप आणि रब्बीचे जिल्हे असणाऱ्या सोलापूर (अधिक १०४ टक्के) आणि धाराशिवमध्ये (अधिक १०२ टक्के) सर्वाधिक पाऊस झाला आहे.

जळगाव आणि लातूरमध्ये सरासरीच्या तुलनेत खूप अधिक पाऊस झाला आहे. तर हिंगोली जिल्ह्यात सर्वांत कमी पाऊस झाल्याने पावसात सरासरीच्या तुलनेत ७८ टक्क्यांची तूट असल्याने दिसून आले आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, कोल्हापूर, नंदुरबार, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी असल्याचे स्पष्ट झाले.

राज्यात जिल्हानिहाय पडलेल्या पावसाचे प्रमाण (तफावत टक्क्यांत) :

सरासरीपेक्षा खूप अधिक (६० टक्क्यांपेक्षा अधिक) : जळगाव, सोलापूर, धाराशिव, लातूर.

सरासरीपेक्षा अधिक (२० ते ५९ टक्के अधिक) : नगर, धुळे, सांगली, बीड, परभणी, बुलडाणा.

सरासरी इतका (उणे १९ ते १९ टक्के अधिक) : पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, नाशिक, पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, अकोला, अमरावती, वर्धा, वाशीम, यवतमाळ.

सरासरीपेक्षा कमी (उणे २० ते उणे ५९ टक्के) : मुंबई शहर, मुंबई उपनगर, कोल्हापूर, नंदुरबार, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर.

सरासरीच्या तुलनेत अपुरा (६० टक्क्यांपेक्षा कमी) : हिंगोली.

जून अखेरपर्यंत राज्यातील जिल्हानिहाय पावसाची स्थिती, सरासरीच्या तुलनेत तफावत :

जिल्हा---सरासरी (मिमी)---पडलेला (मिमी)---तफावत (टक्के)

मुंबई शहर---५४२.३---३३७.८---उणे ३८

मुंबई उपनगर---५३७.१---३४६.९---उणे ३५

पालघर---४१५.१---३८२.४--- उणे ८

रायगड---६५७.९---६२३.१---उणे ५

रत्नागिरी---८४०.२---९२८.७---अधिक ११

सिंधुदुर्ग---८९७.०---८८२.९---उणे २

ठाणे---४६०.१---४१४.४---उणे १०

नगर---११०.८---१३५.८---उणे २३

धुळे---१२०.९---१४८.२---उणे ५३

जळगाव---११९.१---१९५.५--- अधिक ६४

कोल्हापूर---३८०.८---२६६.१---उणे ३०

नंदुरबार---१५५.६---१०६.६---उणे ३२

नाशिक---१६६.०---१४५.५--- उणे १२

पुणे---१८६.८---१९३.५---अधिक ४

सांगली---१२४.१---१६०.६---अधिक २९

सातारा---१९२.५---१७३.१---उणे १०

सोलापूर---१००.८---२०५.९---अधिक १०४

बीड---१२४.८---१६५.०---अधिक ३२

छत्रपती संभाजीनगर---१२१.२---१२३.१---अधिक २

धाराशिव---१२०.७---२४३.६---अधिक १०२

हिंगोली---१७०.७---३८.२---उणे ७८

जालना---१२९.६---१३८.७---अधिक ७

लातूर---१३४.७---२३१.५---अधिक ७२

नांदेड---१५२.५---१३३.४---उणे १३

परभणी---१३८.९--१८६.२---अधिक ३४

अकोला---१४३.६---१५०.८---अधिक ५

अमरावती---१४९.६---१२०.९---उणे १९

भंडारा---१८७.४---७८.९---उणे ५८

बुलडाणा---१३५.९---१७५.१---अधिक २९

चंद्रपूर---१८८.५---१४६.९---उणे २२

गडचिरोली---२२०.१---१३०.४---उणे ४१

गोंदिया---१९६.५---१०३.६---उणे ४७

नागपूर---१७३.९---१३४.८---उणे २२

वर्धा---१७०.२---१५१.८---उणे ११

वाशीम---१७४.७---१८८.५---अधिक ८

यवतमाळ---१७३.०---१९२.२---अधिक ११

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Alert : कोकण, घाटमाथा अन् विदर्भात पावसाचा वाढणार जोर

Zero Tillage Technique : आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात वाहते शून्य मशागत तंत्राचे वारे

Crop Insurance : पीकविम्यासाठी अंतिम मुदतीची वाट पाहू नये

Crop Competition : खरीप हंगामासाठी पीक स्पर्धा

Farmers Protest : कर्जमाफी, पीकविमा भरपाईसाठी ‘रास्ता रोको’

SCROLL FOR NEXT