Weather Update Agrowon
हवामान

Vidarbha Rain : विदर्भात पावसाचा अंदाज

Vidarbha Rain Update : रायगड, रत्नागिरी, पुणे, साताऱ्याच्या घाटमाथ्यावर जोरदार शक्य

Team Agrowon

Vidarbha Weather News : पुणे : बंगालच्या उपसागरात एकामागून एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. यातच राज्यात सुरू असलेल्या पावसाचा जोर काहीसा ओसरण्याची शक्यता आहे. आज (ता. ३०) रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांसह पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा आहे. विदर्भात विजांसह जोरदार पावसाचा, तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

उत्तर ओडिशा पश्चिम बंगाल परिसरावर कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. त्याला लागून समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहत आहेत. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या गंगानगरपासून, रोहतक, लखनौ, गया, रांची, कमी दाबाचे केंद्र ते पूर्व बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे.

कोकण, घाटमाथा, विदर्भात सुरू असलेला पावसाचा जोर ओसरला असला, तरी तुरळक ठिकाणी दमदार पाऊस झाला आहे. राज्यातही हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावली आहे. आज (ता. ३०) कोकणातील रायगड, रत्नागिरीसह पुणे, सातारा जिल्ह्यांचा घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा ‘येलो अलर्ट’ आहे. विदर्भात विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) आहे. उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता कायम आहे.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Crop Insurance : केळी विमाधारकांच्या परताव्याची मागणी

Drought Relief : दुष्काळसदृश स्थितीत पाणी, चारा, रोजगार हमीच्या उपाययोजनांना गती द्या; जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

Beed Crop Damage : बीड जिल्ह्यात २.२३ लाख हेक्टरवरील पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण

PM Modi Baramati Visit: पंतप्रधान मोदी ३ नोव्हेंबरला बारामती दौऱ्यावर शरद पवार यांची माहिती

Crop Damage Survey: परभणी जिल्ह्यात पीक नुकसान पंचनामे वेगाने

SCROLL FOR NEXT