Team Agrowon
महाराष्ट्रात मागच्या दोन आठवड्यांपासून जोरदार पाऊस बरसत होता. दरम्यान कालपासून राज्यात बऱ्यापैकी पावसाचा जोर कमी झाला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढील ३, ४ दिवस पाऊस उसंत घेण्याची शक्यता आहे.
२ ऑगस्टनंतर राज्यात पावसाचा पुन्हा जोर वाढण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली.
राज्यातील पालघर, ठाणे, घोडबंदर, नाशिक, नंदूरबार, पुणे आणि साताऱ्यातील घाट क्षेत्रात पुढचे दोन ते तीन दिवस मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर मुंबईत पावसाचा जोर थांबणार आहे.
परंतु ढगाळ वातावरणामुळे अधूनमधून पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर पुढच्या २४ तासांत मराठवाड्यात हलका ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाकडून देण्यात आली.
जूनमध्ये मान्सूनचा पाऊस ८० टक्के पडतो परंतु जुलैअखेर २३ जिल्ह्यांत सरासरीपेक्षा किंचित जास्त म्हणजे साधारण पाऊस झाला.