Monsoon  Agrowon
हवामान

Maharashtra Rain: विदर्भ, कोकणात पावसाचा अंदाज; मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमीच राहणार

Rain Forecast: राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर कमी झाला. मात्र हवामान विभागाने पुढील ५ दिवस राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज दिला. तर पोषक हवामान असल्याने माॅन्सूनने देशाच्या आणखी काही भागात प्रगती केली होती.

Anil Jadhao 

Pune News: राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर कमी झाला. मात्र हवामान विभागाने पुढील ५ दिवस राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज दिला. तर पोषक हवामान असल्याने माॅन्सूनने देशाच्या आणखी काही भागात प्रगती केली होती. 

हवामान विभागाने आज विदर्भ आणि कोकणातील सर्व जिल्हे तसेच धुळे, नंदूरबार आणि जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला. मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला. मध्य महाराष्ष्ट्रातील आणि मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.

उद्या कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा, विदर्भातील अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि लातूर जिल्ह्यात काहीठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.

रविवारी, सोमवार आणि मंगळवारी कोकणात जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर पूर्व विदर्भातही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर राज्यातील इतर भागातही ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. 

माॅन्सूनने आज संपूर्ण बिहार, पूर्व उत्तर प्रदेश आणि संपूर्ण मध्य प्रदेश व्यापला. तसेच पश्चिम उत्तर प्रदेशचा काही भाग, उत्तराखंडचा बहुतांशी भाग, हिमाचल प्रदेशचा बहुतांशी भाग आणि लडाखच्या काही भागात माॅन्सून दाखल झाला. माॅन्सूनची सिमा आज जयपूर, आग्रा, रामपूर, डहरादून, शिमला आणि मनाली भागात होती. 

माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे. पुढील २ दिवसांत माॅन्सून राजस्थानच्या आणखी काही भागात प्रगती करण्याची शक्यता आहे. तसेच पश्चिम उत्तर प्रदेशचा उरलेला भाग, उत्तराखंड, हिमाचल प्रदेशचा आणखी काही भाग, जम्मू-काश्मिर-गिलगीट-बाल्टीस्थान-मुझफ्फराबाद आणि लडाखच्या आणखी काही भागात माॅन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. तसेच जम्मू आणि काश्मिर, पंजाब,हरियाना, चंदीगड आणि दल्लीच्या काही भागातही माॅन्सून दाखल होण्यासाठी पोषक हवामान असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nandini River Conservation: नंदिनी नदीचा श्वास मोकळा करण्यासाठी राबले हात

Social Awareness: सुशिक्षित समाजातील अंधश्रद्धा अधिक धोकादायक : माजी खासदार कुमार केतकर

Ahilyanagar MLAs: अहिल्यानगर ठरला राज्यातील सर्वाधिक आमदारांचा जिल्हा

Agriculture Awareness Campaign: संतुलित खत वापरासाठी कृषी विज्ञान केंद्राची जनजागृती मोहीम

Farm Loan Waiver Controversy: अटी, शर्तींचे जाळे टाकून शेतकऱ्यांची फसवणूक; कर्जमाफीवर विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT