Rain Update  Agrowon
हवामान

Maharashtra Rain : दोन दिवस पावसाचा जोर राहणार; राज्यात ठिकठिकाणी वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला

Weather Update : हवामान विभागाने आजपासून पुढील ३ दिवस राज्यातील काही भागात विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज दिला.

Anil Jadhao 

Pune News : राज्यातील काही भागात वादळी पाऊस पडत आहे. तर बहुतांशी ठिकाणी ढगाळ वातावरण होते. हवामान विभागाने आजपासून पुढील ३ दिवस राज्यातील काही भागात विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज दिला. 

हवामान विभागाने आज कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे आणि मुंबईत काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज दिला. तर मध्य महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भातही काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला. 

उद्या म्हणजेच शनिवारी कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड आणि ठाणे जिल्ह्यात तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली. नगर, सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यात तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये तसेच संपूर्ण विदर्भात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

रविवारी विदर्भातील बुलडाणा, वाशीम, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदीया, चंद्रपूर, यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड तसेच नगर, सोलापूर, सांगली आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यात काही ठिकामी वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT