Rain Update  Agrowon
हवामान

Rain Forecast : पूर्व विदर्भात विजांसह पावसाचा इशारा

Weather Update : बंगालच्या उपसागरातील 'मिगजौम' चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यात ढगाळ हवामान झाले आहे.

अमोल कुटे

Pune News : बंगालच्या उपसागरातील 'मिगजौम' चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यात ढगाळ हवामान झाले आहे. पावसाला पोषक हवामान झाल्याने पूर्व विदर्भात जोरदार वारे व विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

नैर्ऋत्य अरबी समुद्रात समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती विरून गेली आहे. बंगालच्या उपसागरातील 'मिगजौम' चक्रीवादळामुळे पूर्व किनाऱ्यावर जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यात आकाश ढगाळ झाले आहे.

विदर्भ, मराठवाड्यात पावसाला पोषक हवामान असल्याने, आज (ता. ६) विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहून विजांसह पावसाचा 'येलो अलर्ट' देण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता आहे.

ढगाळ हवामानामुळे राज्यात उकाडा वाढला आहे. तर कमाल आणि किमान तापमानातील वाढ झाली आहे. मंगळवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरी येथे उच्चांकी ३४.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.

राज्यात बुहतांश ठिकाणी कमाल तापमान २८ ते ३४ अंशांच्या दरम्यान आहे. किमान तापमानातील वाढ कायम असून, थंडी गायब झाली आहे. महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी १५.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.

मंगळवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३०.५ (१७.७), जळगाव २९.७(१७.३), कोल्हापूर ३०.० (१९.८), महाबळेश्वर २४.६ (१५.२), नाशिक ३०.५ (१७.७), निफाड ३०.० (१९.२), सांगली २९.२ (१८.८), सातारा ३०.९ (१७.५), सोलापूर ३०.५(१९.८), सांताक्रूझ ३३.७ (२३.८), डहाणू २९.७ (२१.९), रत्नागिरी ३४.७ (२२.१),

छत्रपती संभाजीनगर २९.४ (१८.८), नांदेड ३०.८ (२१.८), परभणी २९.३ (१८.३), अकोला ३०.४ (१९.४), अमरावती ३०.२ (१९.०), बुलढाणा २९.५ (१८.४), ब्रह्मपूरी ३३.७ (२०.९), चंद्रपूर २९.६(१७.६), गडचिरोली २९.४ (१९.६), गोंदिया २८.२ (१७.६), नागपूर ३०.०(२०.९), वर्धा ३०.०(२०.८), वाशीम ३०.८(१७.४), यवतमाळ ३०.० (२०.०).

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली.

विजांसह पावसाची शक्यता :

नांदेड, हिंगोली, परभणी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT