Rain Update Agrowon
हवामान

Rain Forecast : विदर्भ, मराठवाड्यात पावसाची शक्यता

पावसाळी वातावरण निवळू लागताच राज्यात उन्हाचा चटका वाढला आहे. कमाल तापमानात आणि उकाड्यात वाढ झाली आहे.

Team Agrowon

Weather Update पुणे : पावसाळी वातावरण (Rainy Weather) निवळू लागताच राज्यात उन्हाचा चटका (Heat) वाढला आहे. कमाल तापमानात आणि उकाड्यात वाढ झाली आहे.

आज (ता. २६) विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा (Rain Forecast) देण्यात आला आहे. तर मराठवाड्यातही विजासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज आहे.

राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार सुरूच असून, उकाड्यात वाढत होत आहे. शनिवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३७.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

ब्रह्मपूरी, वर्धा येथे कमाल तापमान ३७ अंशांच्या पुढे होते. उर्वरीत राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३१ ते ३५ अंशांच्या दरम्यान होते. तर किमान तापमानाचा पारा बहुतांश ठिकाणी १२ अंशांच्या पुढे कायम आहे.

बिहारपासून, झारखंड, छत्तीसगड, विदर्भ, तेलंगणा ते दक्षिण अंतर्गत कर्नाटकपर्यंत समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून, वाऱ्यांचे प्रवाह खंडीत झाले आहेत.

यातच ईशान्य राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, त्यापासून आसाम पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. आज (ता. २६) मराठवाडा तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे तर विदर्भात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

शनिवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३३.५ (१५.३), जळगाव ३५.३ (१८.४), धुळे ३५.५ (१२.०), कोल्हापूर ३४.९ (१९.१), महाबळेश्वर २९.६ (१३.८), नाशिक ३१.० (१७.२),

निफाड ३२.८(१२.१), सांगली ३५.३ (१८.५), सातारा ३५.० (१६.०), सोलापूर ३७.६(२१.३), सांताक्रूझ ३१.८ (२०.२), डहाणू ३१.२ (१९.६), रत्नागिरी ३२.९ (२१.९),

छत्रपती संभाजीनगर ३३.५ (१७.२), नांदेड ३६.० (२२.०), परभणी ३६.१ (२०.८), अकोला ३६.९ (२०.५), अमरावती ३५.६(१९.२), बुलढाणा ३४.० (१९.६), ब्रह्मपूरी ३७.२ (२२.२), चंद्रपूर ३५.४ (२२.६),

गडचिरोली ३१.६(१७.४), गोंदिया ३५.५ (२१.५), नागपूर ३५.९ (२१.२), वर्धा ३७.२(२२.४), वाशीम ३४.८ (२०.२), यवतमाळ ३६.२ (२०.०).

रविवारी (ता.२६) राज्यातील वादळी पावसाचा इशारा दर्शविणारा नकाशा (स्रोत : हवामान विभाग) :

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

विदर्भ : अमरावती, वर्धा, नागपूर, वाशीम, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT