Rain Alert Agrowon
हवामान

Rain Alert : कोकण, घाटमाथ्यावर ‘ऑरेंज अलर्ट’

Rain Forecasting : मराठवाडा, विदर्भात जोरदार सरी शक्य

Team Agrowon

Weather News : पुणे : किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा, राज्याच्या उत्तरेकडे असलेले पूर्व-पश्‍चिम वाऱ्यांचे जोड क्षेत्र यामुळे राज्याचा घाटमाथा आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने दणक्यात हजेरी लावली आहे. यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ होऊ लागली आहे. आज (ता. २५) कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

झारखंड आणि परिसरावर ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सर्वसाधारण स्थितीवर असून, राजस्थानच्या बिकानेर, सिकार, ग्वालेर, सिधी, दाल्तोंगंज, कॅनिंग ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत आहे. दक्षिण गुजरातपासून ते उत्तर केरळ किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून, गुजरात, मध्य प्रदेशातून पूर्व-पश्‍चिम वाहणाऱ्या परस्पर विरोधी वाऱ्यांचे जोड क्षेत्र सक्रिय आहे.
कोकण, घाटमाथ्यावर पावसाच्या सरी मागून सरी कोसळत होत्या. बुधवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये झालेल्या पावसामुळे धरणांमध्ये पाण्याचा येवा वाढला.

पुणे, सातारा, कोल्हापूर आणि रायगड जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक होता. ताम्हिणी येथे सर्वाधिक ३०० मिलिमीटर, शिरगाव येथे २७०, लोणावळा आणि दावडी येथे २५०, तर आंबोणे २४० आणि वळवण येथे २२० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला. उर्वरित राज्यात अनेक ठिकाणी पावसाची रिपरिप सुरू होती.
आज (ता. २५) कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरीसह पुणे, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ आहे. तसेच मुंबई, सिंधुदुर्ग, नाशिक, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, नागपूर, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा ‘येलो अलर्ट’ आहे. उर्वरित राज्यात पावसाच्या हलक्या सरींची शक्यता आहे.


जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :
पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
मुंबई, सिंधुदुर्ग, नाशिक, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, नागपूर, गोंदिया, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT