Rain Agrowon
हवामान

Monsoon Rain: आज, उद्या राज्यात पावसाची शक्यता; विदर्भात पावसाचा जोर कमीच राहण्याची शक्यता

Rain Forecast: राज्यातील काही भागात मागील ३ दिवसांपासून हलका ते मध्यम पाऊस हजेरी लावत आहे. हवामान विभागाने पुढील ५ दिवस काही ठिकाणी पावसाचा अंदाज दिला.

Anil Jadhao 

Pune News: राज्यातील काही भागात मागील ३ दिवसांपासून हलका ते मध्यम पाऊस हजेरी लावत आहे. हवामान विभागाने पुढील ५ दिवस काही ठिकाणी पावसाचा अंदाज दिला. आज आणि उद्या पावसाचे प्रमाण काहीसे अधिक आहे. तर सोमवारपासून पाऊस कमी होईल, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.

हवामान विभागाने आज राज्यातील मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड आणि धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.

तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहिल्यानगर, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. कोकणातील सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली. कोकणातील इतर जिल्ह्यांमध्येही ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

उद्या विदर्भातील बुलडाणा, अकोला, वर्धा आणि नागपूर तसेच मराठवाड्यातील बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात तर मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलपूर आणि कोल्हापूर तसेच कोकणातील सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील इतर जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाच्या सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.

सोमवारपासून राज्यातील पावसाचे प्रमाण कमी होणार आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात सोमवार आणि मंगळवारी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. बुधवारी पूर्व विदर्भ, दक्षिण मराठवाडा आणि कोकणात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertiliser Subsidy : देशात मागील वर्षीच्या तुलनेत एप्रिल महिन्यासाठी २६ टक्के अधिकचा खतसाठा; केंद्र सरकारचा लोकसभेत दावा

LPG Gas Price: एलपीजी दरवाढ तत्काळ रद्द करा

Food Preservation Technology: अन्नपदार्थ साठवण कालावधी वाढविण्याचे तंत्रज्ञान

Shettale Yojana: शेततळे अनुदान, १७ हजार अर्ज रद्द, कारण काय?

Ammonium Sulphate Fertilizer: अमोनिअम सल्फेटचा फायदेशीर वापर

SCROLL FOR NEXT