Rainy Weather Agrowon
हवामान

Maharashtra Rain Alert : राज्यात उद्यापासून पावसाची शक्यता; मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण अधिक राहण्याचे अंदाज

Rain Forecast : मागील काही दिवसांपासून राज्यातील बहुतांशी भागात पावसाने उघडीप दिली. तर सकाळी हेवत गारवाही जाणवत आहे. तसेच उद्यापासून राज्यातील काही भागात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

Anil Jadhao 

Pune News : मागील काही दिवसांपासून राज्यातील बहुतांशी भागात पावसाने उघडीप दिली. तर सकाळी हेवत गारवाही जाणवत आहे. तसेच उद्यापासून राज्यातील काही भागात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

राज्यातील काही भागात उद्यापासून हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. उद्या विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला. तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. 

बुधवारपासून राज्यात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात तर मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे, नगर तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदीया आणि गडचिरोली जिल्ह्यात काही भागात विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

गुरुवारी आणि शुक्रवारीही कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर काही भागात हलक्या पावसाची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra ST Bus Service Issues: राजकारणासाठी एसटी प्रवासी वेठीला

MAGNET Projects Schemes: ‘मॅग्नेट’अंतर्गत विविध योजनांचा लाभ घ्यावा

Neem Research Centre: भिडीत कडुलिंब संशोधन केंद्र होणार

MSCB Profit: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला ७०२ कोटींचा नफा

NABARD Experience Centre: मुंबईत नाबार्डच्या अनुभव केंद्राचे उद्घाटन

SCROLL FOR NEXT