Rain Agrowon
हवामान

Maharashtra Rain : दक्षिणेकडील जिल्ह्यांत पावसाची शक्यता

Rain Update : कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांत ढगाळ हवामानासह विजा, वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

अमोल कुटे

Pune News : राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होत आहे. पारा ३४ अंशांच्या पार असल्याने अनेक ठिकाणी ‘ऑक्टोबर हीट’चा चटका तापदायक ठरत आहे. आज (ता. ३१) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांत ढगाळ हवामानासह विजा, वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

नैर्ऋत्य अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम दक्षिण आंध्र प्रदेश किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. राज्यात पावसाला पोषक हवामान झाल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये अंशतः ढगाळ हवामान होत आहे. कमाल तापमानातील वाढ कायम असून, किमान तापमानात चढ-उतार होत आहे. पहाटे गारठा, धुके आणि दव पडल्याचे चित्र दिसून येत आहे.

बुधवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३५.८ अंश तापमानाची नोंद झाली. अकोला आणि वर्धा येथे ३५ अंश, तर अमरावती, डहाणू, नागपूर, परभणी, वाशीम, यवतमाळ येथे ३४ अंशापेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे. महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी १७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

आज (ता. ३१) कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, मराठवाड्यातील नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांत विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित महाराष्ट्रात अंशतः ढगाळ हवामानासह तापमानात चढ-उतार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

बुधवारी (ता. ३०) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल आणि किमान तापमान (कंसात) तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३३.७ (१९.२), अहिल्यानगर ३१.९ (१७.७), जळगाव ३३.८ (१८.२), कोल्हापूर ३१.४ (२२.७), महाबळेश्वर २९.३ (१७), मालेगाव ३२.२ (२०), नाशिक ३३ (१८.९), निफाड ३२.६ (१७.५), सांगली ३३.२ (२१.१), सातारा ३३.२ (१९.५), सोलापूर ३५.८ (२३.६), सांताक्रूझ ३३.३ (२४.५), डहाणू ३४.६ (२५), रत्नागिरी ३२.९ (२४.८), छत्रपती संभाजीनगर ३३.४ (१९), बीड ३१.४ (१८.३), धाराशिव ३२.८ (-), परभणी ३४ (२१.३), अकोला ३५.१ (२१.३), अमरावती ३४.८ (२१.६), भंडारा ३०(-), बुलडाणा ३१.२ (२०.५), ब्रह्मपुरी ३२.६ (२२.९), चंद्रपूर ३३.६ (२०.८), गडचिरोली ३३.० (२१.६), गोंदिया ३३.८ (२१.६), नागपूर ३४.६ (२३.१), वर्धा ३५.० (२२.६), वाशीम ३४ (-), यवतमाळ ३४ (२०).

विजांसह वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड.

३४ अंशापेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे :

सोलापूर ३५.८, अकोला ३५.१, वर्धा ३५, अमरावती ३४.८, डहाणू ३४.६, नागपूर ३४.६, परभणी ३४, वाशीम ३४, यवतमाळ ३४.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Shredder: ‘महाडीबीटी’वर कॉटन श्रेडरसाठी अर्ज सुरू

Avliya Avinash Success Story: विनाशकारी कोविड : अवलिया अविनाश

Choose Right Tree: कोणता वृक्ष आणि कुठे लावावा?

Biological Crop Disease Control: केवडा रोग कार्यरत होण्यास वाव, जैविक नियंत्रणावर हवा भर

Weather Stations: स्वयंचलित हवामान केंद्रांशी छेडछाड करणाऱ्यांवर कठोर कारवाई : मित्तल

SCROLL FOR NEXT