Rain Update Agrowon
हवामान

Paus Andaj : बहुतांशी भागात पावसाची उघडीप; राज्याच्या दक्षिण भागात वादळी पावसाचा अंदाज

Rain Forecast : हवामान विभागाने राज्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज दिला. तर बहुतांशी ठिकाणी पावसाची उघडीप राहील, असे सांगितले.

Anil Jadhao 

Pune News : राज्यातील काही भागात मागील दोन दिवसांपासून हलक्या सरी पडत आहेत. तर सकाळी हवेतील गारवाही वाढत असून थंडीची चाहूल लागली आहे. हवामान विभागाने राज्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज दिला. तर बहुतांशी ठिकाणी पावसाची उघडीप राहील, असे सांगितले.

हवामान विभागाने आज कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी आणि रायगड तसेच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, सोलापूर तर मराठवाड्यातील बीड, लातूर, धाराशिव आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त केला. तसेच नगर, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता व्यक्त केली. 

उद्या कोकणातील सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी तसेच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सातारा तर मराठवाड्यातील लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर रायगड, ठाणे, पुणे, अहिल्यानगर, सांगली, सोलापूर, बीड आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे. 

शनिवारी आणि रविवारी दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिण भागात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. मात्र राज्याच्या इतर भागात पाऊस नसेल. सोमवारी राज्यात वातावरण कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: हरभरा आवक कायम, कांद्याच्या भावात वाढ, मेथी बाजारात चढ-उतार, शेवगा दरात बदल तर पपईच्या दरात वाढ

Maharashtra Protest Cases: राजकीय, सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेण्याच्या कालावधीत वाढ, शासन निर्णय जारी

Agricultural Training: कृषी विस्तारकार्याला अधिक गतिमान करा : डॉ. इंद्र मणी

Gajar Gavat Control: गाजर गवताच्या प्रभावी नियंत्रणासाठी काय करावे?

Workers Protest: असंघटित कष्टकऱ्यांचे पैठण गेटवर धरणे आंदोलन

SCROLL FOR NEXT