Monsoon Agrowon
हवामान

Monsoon Rain: पावसाचा जोर कमीच राहणार; राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज

IMD Forecast: माॅन्सूनचा प्रवास मागील ९ दिवसांपासून ठप्प असून हवामान पोषक नसल्याने पावसाचा जोर कमी झाला आहे. राज्यातील काही भागांमध्येच हलक्यापासून ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Anil Jadhao 

Pune News: माॅन्सूनचा प्रवास मागील ९ दिवसांपासून रेंगाळलेला आहे. वाटचालीसाठी पोषक हवामान नसल्याने माॅन्सून एकाच जागेवर आहे. तर राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. 

माॅन्सून २९ मेपासून एकाच जागेवर आहे. माॅन्सूनचे प्रवाह मंदावल्याने वाटचाल झाली नाही तसेच पावसाचा जोरही कमी झाला. माॅन्सूनने आज पुढे प्रवास केला नाही. माॅन्सून आजही मुंबई, अहिल्यानगर, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली भागात होता.

त्यानंतर माॅन्सून पुढे सरकलाच नाही. माॅन्सूनची सिमा आजही मुंबई, अहिल्यानगर, अदिलाबाद, भवानीपटना, पुरी आणि बालूरघाट भागात होती. माॅन्सूनची वाटचाल कधी सुरु होईल, याविषयी हवामान विभागाने माहीती दिलेली नाही. 

हवामान विभागाने आजही राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला. माॅन्सूनचे प्रवाह मंदावल्याने जोर कमी झाला आहे. हवामान विभागाने आज विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार ते हलक्या पावसाचा अंदाज दिला. तसेच पुढील ५ दिवस विदर्भात काही ठिकाणी जोरदार तर काही भागात हलक्या पावसाचा अंदाज दिला. 

मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला. तर छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्टही देण्यात आला. मध्य महाराष्ट्रातही पुढील ५ दिवस काही ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fish Industry Development: माफसू साकारणार ‘मत्स्य तंत्रज्ञान संकुल’

Sugarcane FPR Delay: सोलापुरात २७६ कोटी एफआरपी थकीत; कारखानदारांकडून दिशाभूल

Nashik District Bank: नाशिक जिल्हा बॅंकेला ७५३ कोटींचे भागभांडवल

Ahilyanagar Crop Damage: अहिल्यानगर जिल्ह्यात महिनाभरात ३० हजार हेक्टरवरील पिके बाधीत

Urea Stock: चंद्रपूर जिल्ह्यात युरियाचा वीस हजार टन साठा शिल्लक

SCROLL FOR NEXT