Rain Forecast Agrowon
हवामान

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Rain Update: राज्यातील काही भागात जोरदार सरी पडत आहेत तर काही भागात जोरदार पावसाची प्रतिक्षा कायम आहे. कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज कायम आहे.

Anil Jadhao 

Pune News: राज्यातील काही भागात जोरदार सरी पडत आहेत तर काही भागात जोरदार पावसाची प्रतिक्षा कायम आहे. कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज कायम आहे. तर मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा, खानदेश, मराठवाड्यातील काही जिल्हे आणि पूर्व विदर्भात पुढील ४ दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

माॅन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा म्हणजेच माॅन्सून ट्रफ श्री गंगानगर, भिवानी, आग्रा, बंदा, डेहरी, पुरुलिया, कोलकाता ते पुर्वी आग्नेयपासून ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत आहे. तसेच ईशान्य मध्य प्रदेश आणि शेजारच्या परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत. पश्चिम बंगाल आणि शेजारच्या परिसरावर ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत असून नैऋत्येकडे झुकलेले आहे. या परिसरात पुढील २४ तासांत कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली.

राज्यातील काही भागात पुढील ५ दिवस हवामान विभागाने जोरदार पावसाचा अंदाज दिला. कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात आज आणि उद्या काही ठिकाणी जोरदार ते अजिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला.

तसेच आज आणि उद्या मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर म्हणजेच कोल्हापूर, पुणे, सातारा आणि नाशिक जिल्ह्यातील घाटमाथ्यावर काही ठिकाणी अतिजोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला. पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर रविवारी आणि सोमवारी अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला. मध्य महाराष्ट्रातील इतर भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.

आज, उद्या आणि सोमवारी खानदेशातील ३ जिल्हे, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात तर विदर्भातील वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदीया आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Strawberrry Natural Production: स्ट्रॉबेरीचे पूर्ण नैसर्गिक उत्पादन कौतुकास्पद: आयुक्त मंजिरी मनोलकर

Agriculture Incubation Hubs: कृषी विद्यापीठांत इनक्युबेशन सेंटर

Pune Crop Damage: ‘पूर्वमोसमी’ने अडीच हजार हेक्टरवरील पिके बाधित

Gadchiroli Land Issue: सुपीक जमिनी उद्योगांच्या घशात जाऊ देणार नाही: विजय वडेट्टीवार

Banana Crop Damage: वादळी पावसामुळे केळीचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT