Rain Forecast Agrowon
हवामान

Rain Forecast : विदर्भ, मराठवाड्यात आज पाऊस, गारपिटीचा इशारा

Hailstorm Warning : सूर्य कोपल्याने राज्यात उन्हाचा चटका वाढला आहे. यातच वादळी पाऊस आणि गारपिटीला पोषक हवामान होत आहे.

अमोल कुटे

Pune News : सूर्य कोपल्याने राज्यात उन्हाचा चटका वाढला आहे. यातच वादळी पाऊस आणि गारपिटीला पोषक हवामान होत आहे. आज (ता. ८) विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा, तर मध्य महाराष्ट्रातही वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

ओडिशापासून छत्तीसगड, विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक ते उत्तर तमिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. राज्यात सध्या ढगाळ आकाश होत असून, उन्हाच्या झळा, उकाड्यासह वादळी पावसाला पोषक हवामान होत आहे.

आज (ता. ८) विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया जिल्ह्यात वादळी पाऊस गारपिटीचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. तर उर्वरित विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पाऊस व तुरळक ठिकाणी गारपिटीचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

रविवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर आणि चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ४२.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ४१ अंशांच्या पुढेच आहे. आज (ता. ८) राज्यात उन्हाचा चटका कमी-अधिक होण्याची शक्यता आहे.

रविवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३९.६, नगर ३९.८, धुळे ३९.०, जळगाव ३७.२, कोल्हापूर ३९.६, महाबळेश्वर ३४.३, मालेगाव ३९.०, नाशिक ३६.९, निफाड ३६.५, सातारा ३९.७, सोलापूर ४२.४, सांताक्रूझ ३७.०, डहाणू ३४.९, रत्नागिरी ३४.८,

छत्रपती संभाजीनगर ३९.५, बीड ३९.९, नांदेड ४०.२, परभणी ४१.०, अकोला ४१.५, अमरावती ४१.०, बुलडाणा ३७.४, ब्रह्मपुरी ४१.४, चंद्रपूर ४२.४, गडचिरोली ४१.०, गोंदिया ४०.०, नागपूर ४०.६, वर्धा ४१.४, वाशीम ४१.४, यवतमाळ ४२.०.

- वादळी पाऊस, गारपिटीचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया.

- वादळी पाऊस, गारपीट इशारा (येलो अलर्ट) :

हिंगोली, नांदेड.

- वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

जळगाव, नगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, परभणी, यवतमाळ, वाशीम, बुलडाणा, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली.

४१ अंशांपेक्षा अधिक कमाल तापमान असलेली ठिकाणे

सोलापूर ४२.४, चंद्रपूर ४२.४, यवतमाळ ४२, अकोला ४१.५, ब्रह्मपुरी ४१.४, वर्धा ४१.४, वाशीम ४१.४, परभणी ४१, अमरावती ४१, गडचिरोली ४१.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT