Weather Agrowon
हवामान

Paus Andaj: राज्यात पाऊस, गारपीटीचा अंदाज; राज्यातील काही भागात उष्णतेच्या लाटेचाही इशारा

Weather Forecast: विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात भागात पावसाला पोषक हवामान होत आहे. तर विदर्भातील काही ठिकाणी गारपीटीचाही इशारा देण्यात आला.

Anil Jadhao 

Pune News: विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात भागात पावसाला पोषक हवामान होत आहे. तर विदर्भातील काही ठिकाणी गारपीटीचाही इशारा देण्यात आला. तसेच काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचाही इशारा हवामान विभागाने दिला.

विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी रविवारी गारपीटीचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर भंडारा, गोंदीया काही ठिकाणी जिल्ह्यात सोमवारी गारपीटीचा अंदाज हवामान विभागाने दिला. विदर्भातील अनेक भागात पुढील ४ दिवस पावसाचा अंदाज देण्यात आला.

अमरावती जिल्ह्यात रविवारी आणि सोमवारी, भंडारा जिल्ह्यात रविवारी, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात जिल्ह्यात शनिवार, सोमवार आणि मंगळावरी काही ठिकाणी विजा तसेच ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाचा अंदाज देण्यात आला.

नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात उद्यापासून पुढील ४ दिवस तर यवतमाळ जिल्ह्यात रविवारपासून ३ दिवस पावसाचा अंदाज देण्यात आला. वाशीम जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

अकोला जिल्ह्यात आज आणि उद्या काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला. अमरावती, चंद्रपूर, नागपूर, वर्धा जिल्ह्यात आज उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला.

मराठवाड्यातील लातूर, नांदेड आणि धाराशिव जिल्ह्यात आजपासून ४ दिवस वादळी पावसाचा अंदाज आहे. बीड, हिंगोली, परभणी, जालना जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी पावसाचा अंदाज देण्यात आला. मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात पुढील ३ दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. कोकणातील सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातही काही ठिकाणी हलक्या सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Union Budget: केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७, तंबाखूजन्य पदार्थांवर कर; जाणून घ्या काय स्वस्त, काय महाग 

Solar System: जळगावातील ५०० ग्रामपंचायतींवर सौर यंत्रणा

Dam Water Storage: ‘कसमादे’तील धरणांमध्ये ८० टक्के जलसाठा

Jalyukt Shivar: जलयुक्त शिवारची १६ कोटींची कामे रद्द

Local Body Elections: सिंधुदुर्गात जिल्हा परिषदेच्या ८,तर पंचायत समितीच्या १७ जागा बिनविरोध

SCROLL FOR NEXT