Weather Forecast Agrowon
हवामान

Weather Forecast : मराठवाडा, विदर्भात वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा

Rain Update : सकाळपासून वाढलेला उन्हाचा चटका आणि दुपारनंतर वादळी पाऊस असे विषम हवामान राज्याच्या काही भागांत अनुभवायला मिळत आहे.

अमोल कुटे

Pune News : सकाळपासून वाढलेला उन्हाचा चटका आणि दुपारनंतर वादळी पाऊस असे विषम हवामान राज्याच्या काही भागांत अनुभवायला मिळत आहे. ढगाळ हवामानामुळे कमाल तापमानात चढ-उतार होत आहेत. आज (ता. २४) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. मुंबईसह कोकणात उष्ण व दमट हवामानाचा इशारा कायम आहे.

दक्षिण अंतर्गत कर्नाटक आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. दक्षिण छत्तीसगडपासून मध्य महाराष्ट्र, कर्नाटक ते दक्षिण केरळपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. राज्यात पावसाला पोषक हवामान असल्याने आज (ता. २४) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.

मंगळवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये वाशीम येथे राज्यातील उच्चांकी ४२.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. कमाल तापमानात चढ-उतार होत असून, अनेक ठिकाणी तापमान ४० अंशांच्या वर आहे. आज (ता. २४) मुंबईसह कोकणात उष्ण व दमट हवामानाचा तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका, उकाडा कायम राहण्याचा अंदाज आहे.

मंगळवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३९, नगर ३९.८, धुळे ४१, जळगाव ३६.७, महाबळेश्‍वर ३१.५, मालेगाव ३९.६, नाशिक ३५.९, निफाड ३५.९, सांगली ३७.६, सातारा ३८.६, सोलापूर ४०.२, सांताक्रूझ ३४.८, डहाणू ३४, रत्नागिरी ३४,

छत्रपती संभाजीनगर ३८.२, नांदेड ४०.२, परभणी ४०.७, अकोला ३६.९, अमरावती ३३, बुलडाणा ३८, ब्रह्मपुरी ३७.८, चंद्रपूर ४०.२, गडचिरोली ४०, गोंदिया २६.८, नागपूर ३३, वर्धा ३५.५, वाशीम ४२.२, यवतमाळ ३८.५.

उष्ण व दमट हवामानाचा इशारा (येलो अलर्ट) :

ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली.

४० अंशांपेक्षा अधिक कमाल तापमान असलेली ठिकाणे :

वाशीम ४२.२, धुळे ४१, परभणी ४०.७, सोलापूर ४०.२, नांदेड ४०.२, चंद्रपूर ४०.२, गडचिरोली ४०.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Red Sandalwood: लाल चंदन प्रकरणावर सहा महिन्यांत निर्णय घ्या

Farmer Support: टंचाईत शेतकऱ्यांना अडचणी भासू देऊ नयेत : पालकमंत्री बोर्डीकर

Farmer Support: गंभीर परिस्थितीत शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी : कृषिमंत्री भरणे

Drought Declaration Demands: प्रत्यक्ष नुकसानीच्या आधारे दुष्काळ जाहीर करा : झनक

Multi State Cooperative Society: एन साई मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीला ७ कोटी ९ लाखांचा नफा : ठोंबरे

SCROLL FOR NEXT