Weather Report Agrowon
हवामान

Rain Update : आज आणि उद्या कोणत्या भागात पावसाचा अंदाज? अनेक भागात आज पावसाचा जोर जास्त राहण्याची शक्यता

Weather Report : हवामान विभागाने आज आणि उद्याही काही भागात पाऊस पडू शकतो, असा अंदाज व्यक्त केला.

Anil Jadhao 

IMD Alert : राज्याच्या अनेक भागात सलग तीन दिवस जोरदार हजेरी लावल्यानंतर आज म्हणजेच बुधवारीही काही भागात पाऊस झाला. तसेच हवामान विभागाने आज आणि उद्याही काही भागात पाऊस पडू शकतो, असा अंदाज व्यक्त केला.

हवामान विभागाने आजही राज्याच्या अनेक भागात पावसाचा अंदाज दिला. पुणे, नाशिक, नगर, छत्रपती संभाजीनगर, बीड तसेच बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये विजा आणि ढगांच्या गडगडाटासह ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त केला. या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला. तसेच कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागात विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.

तसेच उद्या म्हणजेच गुरुवारीही राज्याच्या काही भागात जोरदार पाऊस पडू शकतो. नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. तसेच रायगड, ठाणे, जालना आणि धुळे जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT