Maharashtra Rain  Agrowon
हवामान

Vidarbha Rain Alert: विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अंदाज; राज्यात पुढील ५ दिवस पावसाचा इशारा!

Rainfall Prediction: राज्यात हवामान विभागाने पुढील ५ दिवसांसाठी विदर्भ व मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हवामानातील बदलामुळे शेतकरी आणि नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Anil Jadhao 

Pune News: राज्यातील तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. आजही अकोल्यात सर्वाधिक तापमान होते. तर मराठवाडा, विदर्भ आणि दक्षिण महाराष्ट्रातील काही भागात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

हवामान विभागाने कोकणातील पालघर, मुंबई, ठाणे, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी आज आणि उद्या उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज दिला. तर शुक्रवारपासून हवामान कोरडे राहील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, चंद्रपूर, धुळे, नंदूरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यातही काही ठिकाणी आज आणि उद्या उष्ण तसेच दमट हवामानाचा अंदाज आहे. 

कोल्हापूर, सातारा, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी आज विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला. बीड जिल्ह्यात आज तर परभणी, लातूर, धाराशिव आणि नांदेड जिल्ह्यात जिल्ह्यात उद्या आणि शुक्रवारी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आला.

अमरावती, गडचिरोली आणि गोंदीया जिल्ह्यात शनिवारी, भंडारा जिल्ह्यात रविवारी, तर वाशीम जिल्ह्यात शुक्रवारी, यवतमाळ जिल्ह्यात शुक्रवारी आणि शनिवारी तसेच चंद्रपूर जिल्ह्यात शुक्रवार, शनिवार आणि रविवारी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. 

राज्यात उन्हाचा चटकाही चांगलाच वाढला. विदर्भातील बहुतांशी भागात तापमान ४० अंशाच्या वर आहे. आजही अकोल्यात राज्यातील सर्वाधिक ४४.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तर अमरावतीत ४३ अंश सेल्सिअस तापमान होते. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bajara Farming: बाजरीची पेरणी आणि खत व्यवस्थापन; चांगल्या उत्पादनासाठी महत्त्वाच्या गोष्टी

RBI MPC Meeting 2026: कर्जाचा हप्ता वाढणार नाही, पण कमी पावसामुळे महागाई वाढणार- आरबीआय गर्व्हनर

Modern Sowing Machines: पेरणीकरिता आधुनिक यंत्रांचा वापर

Crop Impact Management: विदर्भातील पर्जन्यमान अन् पिकांवरील परिणाम

Kharif Crop Planning: खरिपाच्या पूर्वतयारीसाठी हे मुद्दे नका विसरू

SCROLL FOR NEXT