Rainy Weather Agrowon
हवामान

Unseasonal Rain: विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अंदाज; ऐन उन्हाळ्यात राज्यातील अनेक भागात पावसाला पोषक स्थिती

Maharashtra Weather Alert: हवामान विभागाच्या अंदाजानुसार, या भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस, विजांचा गडगडाट आणि ढगाळ हवामान होण्याची शक्यता आहे.

Anil Jadhao 

Pune News: राज्यात काही ठिकाणी पावसाला पोषक हवामान आहे. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात ढगाळ हवामान आणि हलक्या पावसाचा अंदाज असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. तर दुसरीकडे राज्यात उन्हाचा चटकाही असह्य होत आहे.

विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आजपासून पुढील ४ दिवस पावसाचा अंदाज आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवारी तर भंडारा आणि गोंदीया जिल्ह्यात सोमवार, मंगळवार आणि बुधवारी काही ठिकाणी विजा तसेच ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.

नागपूर आणि अमरावती जिल्ह्यात मंगळवार आणि बुधवारी, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात मंगळवार, बुधवारी आणि गुरुवारी काही ठिकाणी  विजा तसेच ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. वाशीम, बुलडाणा आणि अकोला जिल्ह्यात काही ठिकाणी विजा तसेच ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. यावेळी ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.

मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्येही पावसाचा अंदाज आहे. धाराशिव, लातूर, नांदेड जिल्ह्यात आज आणि उद्या विजा तसेच ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाच येलो अलर्ट देण्यात आला. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी जिल्ह्यात आज तर बीड, हिंगोली जिल्ह्यात आज आणि उद्याही पावसाचा अंदाज देण्यात आला. लातूर जिल्ह्यात बुधवारी आणि गुरुवारी, धाराशिव जिल्ह्यात बुधवारी आणि गुरुवारी, नांदेड जिल्ह्यात बुधवारी हलक्या पावसाचा अंदाज आहे.

सोलापूर जिल्ह्यात आजपासून पुढील ४ दिवस, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात आजपासून बुधवारपर्यंत, पुणे आणि सातारा जिल्ह्यात आज आणि उद्या, नगर आणि जळगाव जिल्ह्यात आज हलक्या पावसाची शक्यता आहे. कोकणातील सिंधुदूर्ग जिल्ह्यातही आजपासून बुधवारपर्यंत तर रत्नागिरी जिल्ह्यात आज हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT