Rain Agrowon
हवामान

Vidarbha Rain: विदर्भात पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात उष्णता वाढण्याची शक्यता 

Rain Forecast: विदर्भातील काही जिल्ह्यांत पावसास पोषक वातावरण तयार झाले असतानाच, इतर ठिकाणी उष्णता आणि दमट हवामान वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

Anil Jadhao 

Pune News: विदर्भातील काही भागात पावसाला पोषक स्थिती आहे, तर काही ठिकाणी उन्हाचा कडाकाही चांगलाच वाढला. राज्यातील इतर भागातही काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

विदर्भातील भंडारा जिल्ह्यात आज ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आला. चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात शनिवार, रविवार आणि सोमवारी काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

यवतमाळ जिल्ह्यात आज आणि उद्या, वर्धा, नागपूर आणि गोंदीया जिह्यात जिल्ह्यात आज आणि सोमवारी काही ठिकाणी विजा तसेच ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर यावेळी ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. 

सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातही काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाचा इशाराही हवामान विभागाने दिला. पुणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर जिल्ह्यात उद्या काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा आहे. 

अकोला जिल्ह्यात काही ठिकाणी सोमवार, मंगळवार आणि बुधवारी उष्णतेच्या लाटेचा इशाराही हवामान विभागाने दिला. तर अमरावती, गडचिरोली जिल्ह्यात सोमवारी, चंद्रपूर जिल्ह्यात सोमवारी आणि मंगळवारी तसेच यवतमाळ जिल्ह्यात मंगळवारी आणि बुधवारी उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT