Rain  Agrowon
हवामान

Monsoon Rain: विदर्भात उद्यापासून पावसाचा अंदाज; राज्यातील माॅन्सूनचा प्रवास ५ व्या दिवशीही रखडला

Rain Forecast: राज्यात जोरदार मुसंडी मारल्यानंतर माॅन्सूनचा प्रवास थबकलेलाच आहे. तर राज्यातील पावसाचे प्रमाणही कमी झाले आहे. राज्यातील काही भागात पुढील ५ दिवस हलक्या ते मध्यम सरींची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

Anil Jadhao 

Pune News: राज्यात जोरदार मुसंडी मारल्यानंतर माॅन्सूनचा प्रवास थबकलेलाच आहे. तर राज्यातील पावसाचे प्रमाणही कमी झाले आहे. राज्यातील काही भागात पुढील ५ दिवस हलक्या ते मध्यम सरींची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. 

राज्यात माॅन्सून २८ मे पासून एकाच भागात अडकला आहे. माॅन्सूनने २८ मे रोजी मुंबई, अहिल्यानगर, बीड,नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यापर्यंत माॅन्सूनने चाल केली होती. मात्र त्यानंतर माॅन्सूनचे प्रवाह मंदावले. त्यामुळे राज्यातील प्रवासही मंदावला आहे. माॅन्सूनची सिमा आजही मुंबई, अहिल्यानगर, अदिलाबाद, भवानीपटना, पुरी आणि बालूरघाट भागात होती. 

राज्यातही पावसाचा जोर मागील ३ दिवसांपासून कमी झाला आहे. विदर्भातील काही भागात जोरदार पावसाची नोंद झाली. मात्र सर्वदूर पावसाचे प्रमाण कमी आहे. हवामान विभागाने पुढील ५ दिवस राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला. तर काही ठिकाणी जोरदार सरीही पडतील, असेही म्हटले आहे.

आज आणि उद्या सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी तसेच वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदीया आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. बुधवारी आणि विदर्भातील सर्व जिल्हे, खानदेश आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. राज्याच्या इतर भागात सोमवार ते शुक्रवारी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cadre Structure Cancellation: आकृतिबंध अखेर रद्द; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची घोषणा

Government Inquiry: माजी सचिवांची चौकशी होणार

Pulses Market: अकोला बाजरात तूर, हरभरा दरवाढीचा कल

Heavy Rain Alert: उत्तर महाराष्ट्रात ‘ऑरेंज अलर्ट’

Hingoli Crop Loan : हिंगोली जिल्ह्यात पीककर्ज वाटपाचे ३५.१६ टक्के उद्दिष्ट साध्य

SCROLL FOR NEXT