Weather  Agrowon
हवामान

Maharashtra Rain: काही ठिकाणी आजही पावसाचा अंदाज; विदर्भात हलक्या पावसाचा येलो अलर्ट

Weather Update : हवामान विभागाने राज्यातील काही भागात आज आणि उद्या पावसाचा अंदाज दिला. तर काही ठिकाणी गारपीटीचाही इशारा दिला.

Anil Jadhao 

Pune News : हवामान विभागाने राज्यातील काही भागात आज आणि उद्या पावसाचा अंदाज दिला. तर काही ठिकाणी गारपीटीचाही इशारा दिला. विदर्भात हलक्या पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. 


हवामान विभागाने आज विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, अमरावती, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदीया आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाचा येलो अलर्ट दिला.

तर वाशीम जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीटीचीही शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली. तसेच या जिल्ह्यांमध्ये ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारेही वाहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. 

तर लातूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर उद्या म्हणजे मंगळवारीही विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाचा अंदाज आहे.

वाशीम, यवतमाळ, अमरावती, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. तर यावेळी ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारेही वाहू शकते, असा अंदाज हवामान विभागाने दिला. हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसाच्या सरी पडतील, असा अंदाजही वर्तविण्यात आला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT