Weather Update Agrowon
हवामान

Maharashtra Rain : पुढील चार दिवस काही भागात पावसाचा अंदाज; संपूर्ण विदर्भ, मराठवाड्यातील काही भागात पावसाचा येलो अलर्ट

Weather Forecast : राज्याच्या काही भागात पावसाचा अंदाज कायम आहे. पुढील चार दिलस काही भागात पावसाची शक्यता हवामान विभागाने दिली.

Anil Jadhao 

Pune News : राज्याच्या काही भागात पावसाचा अंदाज कायम आहे. पुढील चार दिलस काही भागात पावसाची शक्यता हवामान विभागाने दिली. तर काही भागात उन्हाचा चटका चांगला वाढला. राज्यातील अनेक भागात तापमान ४० अंशाच्या पुढे आहे. 

हवामान विभागाने आज संपूर्ण विदर्भ तसेच मराठवड्यातील नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ दिला. तसेच बीड, परभणी, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी पडतील असाही अंदाज दिला.

उद्या म्हणजेच मंगळवारी संपूर्ण विदर्भ, मराठवड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड आणि परभणी जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज दिला. तर बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नगर, पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज दिला. 

बुधवारी संपूर्ण विदर्भ, मराठवड्यातील हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव मध्य महाराष्ट्रातील सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. तर सातारा, पुणे, जालना, छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव जिल्ह्यात काही ठिकाण मेघगर्जेनेसह पावसाचा अंदाज देण्यात आला. 

गुरुवारी आणि शुक्रवारीही विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाचा अंदाज देण्यात आला. आज सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रायलसिमा भागातील अनंतपूर येथे देशातील सर्वाधिक ४४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तर राज्यातील अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ४१ अंशांच्या पुढेच आहे. राज्यात उन्हाचा चटका कमी-अधिक होण्याची शक्यता आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Watermelon Sales Decline: टरबूज विक्रीवर मुंबईतील घटनेचे सावट

Farm Roads: वर्षानुवर्षे बंद असलेले ‘शिवरस्ते’ झाले मोकळे

Monsoon 2026: यंदा मॉन्सून दगा देणार?; 'एल निनो'मुळे खरीप पीक उत्पादन घटणार, 'आयसीएआर'च्या अभ्यासातून चिंता व्यक्त

Crop Insurance Compensation: पीकविमा भरपाईचे ३३६ कोटी तातडीने वाटप करा : जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

Farm Pond Lining: शेततळ्याचे अस्तरीकरण कसे करावे; अस्तरीकरणासाठी शासनाकडून अनुदान किती?

SCROLL FOR NEXT