Rain Alert Agrowon
हवामान

Maharashtra Rain: मराठवाड्यात पावसाचा अंदाज; विदर्भात उन्हाचा चटका तापदायक ठरण्यास सुरुवात

Maharashtra Weather Update: राज्यात पुढील पाच दिवस विविध भागांमध्ये हवामानात मोठा बदल जाणवणार आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज तर विदर्भ, खानदेश आणि कोकणात उष्णतेची लाट त्रासदायक ठरणार आहे.

Anil Jadhao 

Pune News: राज्यातील काही भागात पुढील ५ दिवस ऊन्हाचा चटका वाढणार आहे. तर काही भागात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज आहे. कोकण आणि खानदेशात उष्णता वाढण्याची शक्यता आहे तसेच विदर्भात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशाराही हवामान विभागाने दिला. 

हवामान विभागाने उद्या कोल्हापूर, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जलना आणि बीड जिल्ह्यात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज दिला. तर सोलापूर आणि परभणी जिल्ह्यात बुधवारी तर लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात बुधवार आणि गुरुवारी, नांदेड जिल्ह्यात गुरुवारी पावसाचा अंदाज असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. तर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात शुक्रवारी काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

विदर्भात उन्हाचा चटका वाढणार आहे. यवतमाळ जिल्ह्यात उद्या काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला. अकोला जिल्ह्यात बुधवारी आणि गुरुवारी काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला. नागपूर जिल्ह्यातही बुधवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला. 

खानदेशातील धुळे, जळगाव नंदूरबार तसेच नाशिक जिल्ह्यात बुधवारी आणि गुरवारी उष्ण आणि दमट हवामानचा अंदाज आहे. कोकणात उष्ण आणि दमट हवामानचा अंदाज देण्यात आला आहे. सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, पालघर, ठाणे जिल्ह्यात आजपासून तीन दिवस काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज हवामान विभागाने दिला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mumbai APMC: मुंबई बाजार समितीच्या कारभाराची होणार चौकशी

Israel Lebanon Conflict: लेबनॉनमध्ये युद्धविराम नाही

White Grub Pest Management: हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शन मोहीम

Central Government Policy: कांदा, साखर उद्योगांबाबत बुधवारपर्यंत केंद्र निर्णय घेईल : आमदार दिलीप वळसे पाटील

Soybean Oil Demand: अमेरिकेत जैवइंधनासाठी सोयातेलाचा वापर वाढता

SCROLL FOR NEXT