Monsoon Rain Agrowon
हवामान

Monsoon Rain : राज्याच्या अनेक भागात पावसाचा अंदाज; विदर्भ, कोकणासह मध्य महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज

Weather Update : हवामान विभागाने विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज दिला.

Anil Jadhao 

Pune News : राज्याच्या बहुतांशी भागात कालपासून पावसाचा जोर कमी झालेला आहे. बहुतांशी भागात ऊन सावल्यांचा खेळ सुरु असल्याचे दिसत आहे. पण हवामान विभागाने विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज दिला. 

हवामान विभागाने आज विदर्भातील बुलडाणा, अमरावती, अकोला, वाशीम, यवतमाळ, गडचिरोली, नागपूर, वर्धा, गोंदीया, भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यांना काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला.

तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यातही येलो अलर्ट देण्यात आला. तर आज मराठवाडा आणि खानदेश तसेच इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला आहे. 

उद्या कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे आणि नाशिक तर विदर्भातील अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदीया जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. तर मराठवाडा आणि खानदेशसह इतर जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची काही भागात हजेरी राहू शकते, असाही अंदाज दिला. 

शुक्रवारपासून राज्याच्या काही भागात आणखी पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्याला काही ठिकाणी अतिजोरदार ते जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला. तर संपूर्ण विदर्भात शुक्रवारपासून पुढील ३ दिवस ठिकठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune Rainfall: पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

MKCL Investment: ‘एमकेसीएल’ने सरकारमध्ये गुंतवणूक करावी; शरद पवार यांची अपेक्षा

Market License Cancellation: पणन संचालकांचा खासगी बाजारांवर कारवाईचा धडाका; ‘रामेश्वर, ‘कसमादे’, ‘जय गजानन’ बाजारांचे परवाने रद्द

Indigenous Livestock Breeds: सोळा नव्या देशी पशुजातींना मान्यता

Agro-Service Federation's Protest: प्रस्तावित आकृतिबंधाविरोधात कृषी सेवा महासंघाचे आंदोलन

SCROLL FOR NEXT