Rain Forecast Agrowon
हवामान

Monsoon Rain: विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अंदाज; कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहणार

Monsoon Update: राज्यातील अनेक भागात मागील दोन दिवसांपासून पाऊस हजेरी लावत आहे. पुढील ५ दिवस राज्यात ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. विदर्भातील काही भागात मात्र पावसाचा जोर कमीच राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

Anil Jadhao 

Pune News: राज्यातील अनेक भागात मागील दोन दिवसांपासून पाऊस हजेरी लावत आहे. पुढील ५ दिवस राज्यात ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. विदर्भातील काही भागात मात्र पावसाचा जोर कमीच राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पुढील ५ दिवस जोरदार पावसाचा अंदाज आहे. सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे आणि नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरही जोरदार पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांच्या इतर भागात मात्र हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. सांगली, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. 

मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमीच राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पुढील ५ दिवस काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. आज छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. 

विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, गोंदीया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात  आज काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. उद्या आणि परवा विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी राहणार आहे. तर शनिवारपासून पुन्हा विदर्भात पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Machinery : महिला बचत गटांना ‘कृषी अवजारे बँके’ची सुवर्णसंधी

Akola Drought Update : अकोला जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा : गवळी

Jambatanda Storage Tank : जांबतांडा साठवण तलावासाठी प्रशासनाकडून हालचाली

Sangli Rainfall : सांगलीत ऑगस्टच्या पहिल्या २१ दिवसांत ५१ टक्के पाऊस

Water Security : नियोजनातून जलसुरक्षेचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न : डॉ. गेडाम

SCROLL FOR NEXT