Rain Agrowon
हवामान

Unseasonal Rain: विदर्भात दोन-तीन दिवस पावसाचा अंदाज; मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उन्हाचा चटका वाढणार!

Vidarbha Weather Update: हवामान विभागाने राज्यातील काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला आहे.

Anil Jadhao 

Pune News: राज्यातील मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात आजही पावसाचा अंदाज आहे. तर विदर्भातील काही ठिकाणी आजपासून पुढील २ ते ३ दिवस पावसाची शक्यता आहे. तर उद्यापासून राज्यात उन्हाचा चटका आणखी वाढेल, असाही अंदाज हावामान विभागाने दिला. 

हवामान विभागाने आज कोकणातील सिंधुदूर्ग, तसेच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, धाराशिव जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. तर लातूर जिल्ह्यातील काही भागात आज आणि उद्या पावसाचा अंदाज देण्यात आला.

बुलडाणा, वाशीम, अकोला जिल्ह्यात उद्या तर चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात आज आणि उद्या विजा आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज देण्यात आला. तसेच भंडारा आणि गोंदीया जिल्ह्यात जिल्ह्यात बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. 

पावसाचे वातावरण निवळ्यानंतर राज्यात उन्हाचा चटका वाढण्याचा अंदाज आहे. छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जळगाव, नंदूरबार आणि धुळे जिल्ह्यात जिल्ह्यात गुरुवारी आणि शुक्रवारी उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज आहे. तर जालना, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात शुक्रवारी आणि शनिवारी उष्ण आणि दमट हवामान राहील, असे हवामान विभागाने म्हटले आहे. 

परभणी जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी तर बीड जिल्ह्यात गुरुवार, शुक्रवार आणि रविवारी तसेच लातूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यात शुक्रवार, शनिवार आणि रविवारी उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला. पुणे, धाराशिव, सोलापूर जिल्ह्यात गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवारी उष्ण आणि दमट हवामान असेल, असेही हवामान विभागाने म्हटले आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Biological Crop Disease Management: जैविक पद्धतीने भुरी नियंत्रण यशस्वी करण्याच्या उपाययोजना

Organic Farming Success Story: सेंद्रिय, स्वावलंबी शेती पध्दतीचे साकारले मॉडेल

Artificial Intelligence: ‘एआय’ उडविणार झोप ...

India UK Trade Deal: व्यापार कराराचे फलित

Waste Management: कचऱ्याच्या ढिगाखाली गाडलेली व्यवस्था

SCROLL FOR NEXT