Heat Wave  Agrowon
हवामान

Heatwave Alert: राज्यात तीन दिवस पावसाचा अंदाज; गुरुवारपासून राज्यातील बहुतांशी भागात उन्हाचा चटका वाढणार

Maharashtra Weather: राज्यात सध्या हवामानात उलथापालथ सुरू असून काही भागांत विजांसह पावसाचा अंदाज आहे, तर अनेक जिल्ह्यांत गुरुवारपासून उष्णतेची लाट जाणवणार आहे. हवामान विभागाने दमट व कोरड्या हवामानाचा इशारा दिला आहे.

Anil Jadhao 

Pune News: राज्यात सध्या कडक ऊन आणि काही ठिकाणी पाऊस, अशी परिस्थिती दिसत आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाचा अंदाज आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठड्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला. 

हवामान विभागाने आज विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाचा अंदाज दिला. मराठवाड्यातील बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात काही भागात विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आला. 

याशिवाय सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. तर कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, अकोला, अमरावती, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यतमाळ जिल्ह्यात उद्याही पावसाचा अंदाज आहे. गोंदीया, भंडारा, लातूर आणि सातारा जिल्ह्यात गुरुवारीही पावाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

कोकणात आज उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा देण्यात आला होता. धुळे, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव जिल्ह्यात गुरुवारी आणि शुक्रवारी दमट आणि कोरड्या हवामानाचा इशारा देण्यात आला.

नंदूरबार, भंडारा, गोंदीया जिल्ह्यात गुरुवारी, जळगाव जिल्ह्यात शुक्रवारी उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा देण्यात आला. तसेच लातूर, जालना जिल्ह्यात शुक्रवार आणि शनिवारी तर नांदेड, हिंगोली, परभणी, जिल्ह्यात शनिवारी उष्ण आणि दमट हवामानचा इशारा आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

Ahilyanagar Karjmafi : अहिल्यानगरला तिसऱ्या टप्प्यात ८८ कोटी ८१ लाखांची कर्जमाफी

SCROLL FOR NEXT