Rain Forecast Agrowon
हवामान

Maharashtra Paus Andaj : पुढील ४ दिवस पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये पाऊस हजेरी लावण्याची शक्यता

Rain Forecast : हवामान विभागाने पुढील चार दिवस राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला आहे.

Anil Jadhao 

Pune News : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस हजेरी लावत आहे. तर पावसाची उघडीप असलेल्या जिल्ह्यांमध्ये उन्हाचा चटका जाणवत आहे. हवामान विभागाने पुढील चार दिवस राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला आहे.

पूर्व मध्य अरबी समुद्रात कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. तर समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती पुढील २ दिवसांमध्ये भारताच्या किनाऱ्यापासून दूर पूर्व-वायव्य भागाकडे सरकण्याची शक्यता आहे. तर दक्षिण भारतातील काही भागात पुढील २ दिवस जोरदार पावसाचा अंदाज आहे. राज्यातही अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

हवामान विभागाने आज राज्यभरात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला. नगर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदूरबार जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला. तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यांना काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाजही हवामान विभागने दिला. 

उद्याही नगर, नाशिक आणि धुळे जिल्ह्याला काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट दिला. तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

सोमवारी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला. तर मंगळवारी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT