Rain Agrowon
हवामान

Rain Alert : तीन दिवस काही भागात पावसाचा अंदाज; राज्यातील काही भागांना येलो अलर्ट; थंडीची चाहूल

Rain Forecast : हवामान विभागाने राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला.

Anil Jadhao 

Pune News : राज्यात सध्या सकाळी हवेतील गारवा वाढत आहे. तर दुपारी उन्हाचा चटका जाणवत आहे. तसेच राज्यातील काही भागात हलक्या सरी देखील हजेरी लावत आहेत. हवामान विभागाने राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला. 

हवामान विभागाने आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाचा अंदाज आहे. आज कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड आणि ठाणे जिल्ह्यात तर मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, पुणे, सातारा, सोलापूर, नगर आणि नाशिक तसेच मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला. 

उद्या आणि गुरुवारीही कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, सातारा, सांगली, नगर तसेच मराठवाड्यातील बीड, लातूर, धाराशिव आणि नांदेड जिल्ह्यातील काही ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट दिला. शुक्रवारी पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे.

सिंधुदूर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. तर सांगली, सोलापूर, नगर मराठवाड्यातील बीड, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer Supply: जेवढी शेतीसाठी गरज, तेवढेच खत शेतकऱ्यांना मिळणार, कृषी विभागाचा निर्णय

Crop Insurance: शेतकऱ्यांना खरिपासाठी एकूण किती भरपाई आतापर्यंत मंजूर झाली?

Parbhani Kharif Planning: खरिपासाठी ७९ हजार ५२२ क्विंटल बियाण्याची मागणी

DJ Noise Incident: लग्नाच्या वरातीत डीजेचा दणदणाट, १४० कोंबड्यांचा मृत्यू, गुन्हा नोंद

Mango Loss 2026: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू नुकसानीचे पंचनामे सुरू

SCROLL FOR NEXT