Rain Agrowon
हवामान

Maharashtra Rain : मराठवाडा, विदर्भात पावसाचा अंदाज; राज्यात शनिवार, रविवार पावसाचा जोर कमी राहणार

Weather Forecast: राज्यातील बहुतांशी भागात आज दुपारपर्यंत ढगाळ वातावरण होते. तर मराठवाडा आणि पूर्व विदर्भात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली.

Anil Jadhao 

Pune News: राज्यातील बहुतांशी भागात आज दुपारपर्यंत ढगाळ वातावरण होते. तर मराठवाडा आणि पूर्व विदर्भात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. हवामान विभागाने दक्षिण मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तविली. पुढील ५ दिवस राज्यात ठिकठिकाणी पावसाचा अंदाज देण्यात आला. 

हवामान विभागाने आज विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर, भांडारा, गोंदीया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. तसेच सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला कोल्हापूर, सातारा, पुणे, नगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला. 

उद्या सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड आणि बीड जिल्ह्यात तसेच विदर्भातील अकोला आणि अमरावती जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. मराठवाड्यातील आणि मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

शनिवारी रत्नागिरी, रायगड आणि सोलापूर, धाराशिव तसेच लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील इतर जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज आहे. विदर्भात शनिवारी आणि रविवारी पावसाची उघडीप राहणार आहे. रविवारी राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता आहे. तर इतर भागात पाऊस उघडीप देईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

सोमवारी विदर्भात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. मराठवाड्यात ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातही काही ठिकाणी हलक्या सरी पडतील अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Seed Law: स्वतंत्र बियाणे कायदा करणार: कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

Gold Market: गुंतवणुकीसाठी सोने खरेदीकडे कल

Transparency in Quality Control: ‘गुणनियंत्रणा’साठी ई-लॅब, ई-इन्स्पेक्टर

Maharashtra Heatwave: उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता

Sugarcane FRP: साखर कारखान्यांकडे ३,५०० कोटींची एफआरपी थकीत, राजू शेट्टींची माहिती, साखर आयुक्तांची घेतली भेट

SCROLL FOR NEXT