Rain Forecast Agrowon
हवामान

Vidarbha Paus Andaj: विदर्भात ५ दिवस पावसाचा अंदाज; दोन जिल्ह्यांमध्ये उद्या गारपीटीचीही शक्यता

Hailstorm Alert: हवामान विभागाने विदर्भात ५ दिवस पावसाचा अंदाज दिला आहे, आणि त्यात दोन जिल्ह्यांमध्ये गारपीटीची शक्यता आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Anil Jadhao 

Pune News: विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाला पोषक हवामान आहे. त्यामुळे मराठवाड्यात आज आणि उद्या तर विदर्भातील काही ठिकाणी पुढील ५ दिवस वादळी पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रातही काही भागात ढगाळ वातावरणासह हलक्या सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. 

विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. चंद्रपूर, नागपूर, वर्धा, गडचिरोली आणि गोंदीया जिल्ह्यात आजपासून पुढील ५ दिवस काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

तर यवतमाळ जिल्ह्यात आजपासून ३ दिवस आणि वाशीम जिल्ह्यात उद्या आणि सोमवारी काही भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे. बुलडाणा आणि अकोला जिल्ह्यात उद्या हलक्या पावसाची काही भागात शक्यता आहे.

मराठवड्यातील काही भागात दोन दिवस पावसाचा अंदाज आहे. धाराशीव, परभणी, नांदेड, जिल्ह्यात आज आणि उद्या काही भागात विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर परभणी, बीड आणि जालना जिल्ह्यात आज आणि उद्या उष्ण तसेच दमट हवामानाचा अंदाज आहे, असेही हवामान विभागाने म्हटले आहे. 

मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. पुणे, अहिल्यानगर, नाशिक, सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

MIDC Long March : एमआयडीसीविरोधात वर्णे ते सातारा ‘लाँग मार्च’

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

SCROLL FOR NEXT