Monsoon Rain Agrowon
हवामान

Monsoon Rain: राज्यात २ दिवस पावसाचा अंदाज; मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाची उघडीप

Maharashtra Rain Forecast: मागील ३ दिवसांपासून कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा, खानदेश आणि पूर्व विदर्भातील काही भागात जोरदार पाऊस पडत आहे. हवामान विभागाने या भागांमध्ये काही ठिकाणी पुढील ३ दिवस जोरदार पावसाचा अंदाज दिला.

Anil Jadhao 

Heavy Rain Alert in Maharashtra: मागील ३ दिवसांपासून कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा, खानदेश आणि पूर्व विदर्भातील काही भागात जोरदार पाऊस पडत आहे. हवामान विभागाने या भागांमध्ये काही ठिकाणी पुढील ३ दिवस जोरदार पावसाचा अंदाज दिला. मात्र, शुक्रवारपासून पावसाचा जोर कमी होऊन राज्यातील बहुतांशी भागात पावसाची उघडीप राहू शकते, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

माॅन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा म्हणजेच माॅन्सून ट्रफ आपल्या सर्वसाधारण जागेवर आहे. तसेच दक्षिण गुजरात आणि शेजारच्या परिसरावर चक्राकार वारे वाहत आहे.पश्चिम बंगालचा दक्षिण भाग आणि परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र पुढील २ दिवसांत हळूहळू पश्चिम वायव्य दिशेने झारखंड आणि उत्तर छत्तीसगडकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे मध्य भारत आणि उत्तर भारतात पावसाचा अंदाज आहे. 

विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदीया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात आज काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला. अमरावती, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. खानदेशातील जळगाव, धुळे आणि जळगाव तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावरही जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. 


उद्या कोकणातील सर्व जिल्हे, खानदेशातील ३ जिल्हे, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावरही काही भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, परभणी आणि हिंगोली तसेच विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदीया आणि गडचिरोली जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. 

गुरुवारी विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी आणि रायगड तसेच मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावरही जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली. शुक्रवारपासून मात्र राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी आणि शनिवारी मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्रातील काही भागात हलक्या ते मध्यम सरी पडतील, इतर भागात पावसाची उघडीप राहू शकते, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Subsidy: 'गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार'साठी १२५ कोटी निधी मंजूर, ३२ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मिळणार अनुदान

Warehouse Receipt Business: गोदाम उभारणीद्वारे शेतीमाल विक्री व्यवस्थापन

Agriculture Planning: मराठवाड्यात यंदा खरिपात कपाशी, सोयाबीनचे ७८.७३ टक्के क्षेत्र प्रस्तावित

Inspiring Conservation Story: एका माणसाच्या ध्यासातून उभारले अभयारण्य

Waiting For Rain: शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT