Rain Forecast  Agrowon
हवामान

Rain Alert : राज्यात पावसाचा अंदाज; राज्यात तीन दिवस विविध भागात हलक्या पावसाचा अंदाज

Rain News : राज्यात उन्हाचा कडाका कायम आहे. राज्यातील काही भागात कालपासून ढगाळ हवामान दिसत आहे. तर दुसरीकडे उन्हाचा चटकाही जाणवत आहे.

अनिल जाधव

Pune News : राज्यात उन्हाचा कडाका कायम आहे. राज्यातील काही भागात कालपासून ढगाळ हवामान दिसत आहे. तर दुसरीकडे उन्हाचा चटकाही जाणवत आहे. तर हवामान विभागाने उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात दोन दिवसांनंतर पावसाचा अंदाज दिला आहे.

हवामान विभागाने बुधवारी धुळे, नंदूरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काही भागात ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज दिला. तर जालना, परभणी, हिंगोली जिल्ह्यातही काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज दिला.

तसेच चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा येलो अलर्ट दिला. यावेळी ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची देखील शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली.

शुक्रवारी परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला. तर भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा येलो अलर्ट दिला.

यावेळी ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची देखील शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली. तसेच राज्यातील काही भागात ढगाळ हवामान राहील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan Account Verification: शेतकऱ्यांच्या खात्यांची कर्जमाफीसाठी तपासणी

Monsoon In Kerala: आनंदघन केरळात

Onion Procurement Rules: कांदा खरेदीचे निकष शिथिल

Vidarbha Rain Forecast: विदर्भात वादळी पावसाचा इशारा

Dahivadi Heavy Rain: दहिवडी परिसराला पावसाने झोडपले

SCROLL FOR NEXT