Rain Forecast Agrowon
हवामान

Rain Forecast : कोकणात पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता

Rain Prediction : कोकणासह, घाटमाथ्यावर पावसाचा जोर दोन दिवसात काहीसा ओसरण्याची शक्यता आहे. आज (ता. ९) कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

Team Agrowon

Weather Update Pune : कोकणासह, घाटमाथ्यावर पावसाचा जोर दोन दिवसात काहीसा ओसरण्याची शक्यता आहे. आज (ता. ९) कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर विदर्भात विजांसह पावसाचा, तर उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे कायम असून, राजस्थानच्या जैसलमेर, कोटा, शिवपूरी, सिधी, बालासोर ते वायव्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे.

पश्चिम किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा दक्षिण गुजरातपासून केरळ किनारपट्टीपर्यंत कायम आहे. झारखंड आणि परिसरावर समुद्रसापाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

दक्षिणकेडे आलेला मॉन्सूनचा आस, किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा यामुळे कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडत आहे.

आज (ता. ९) कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. विदर्भात विजांसह पावसाचा, उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट) :

पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे.

विजांसह पावसाचा इशारा (यलो अलर्ट) :

बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT