Weather Update Agrowon
हवामान

Summer Heat Update : राज्यात उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता

Weather Update : अवकाळी पावसाच्या तडाख्यानंतर राज्यात उन्हाच्या झळा वाढल्या आहेत.

अमोल कुटे

Pune News : अवकाळी पावसाच्या तडाख्यानंतर राज्यात उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. कमाल तापमानाचा पारा ३९ अंशांपार गेल्याने मार्च महिन्याच्या सुरवातीलाच उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. अवकाळी पावसाने उघडीप दिल्याने आजपासून (ता. ४) राज्यात उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

गेल्या आठवड्यात राज्याच्या विविध भागात वादळी पाऊस आणि गारपिटीने तडाखा दिला. यातच दुपारच्या वेळी उन्हाचा चटका, उकाडा तापदायक ठरत आहे. रविवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांत विदर्भातील यवतमाळ येथे राज्यातील उच्चांकी ३९.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात अनेक ठिकाणी कमाल तापमान ३६ अंशांच्या पार असल्याने उन्हाळ्याची चाहूल लागली आहे.

मध्यप्रदेशपासून कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा

मध्यप्रदेशपासून कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. राज्यात अंशतः ढगाळ हवामान होत असून, उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे. आज पासून (ता.४) कमाल तापमानात २ ते ३ अंशांची वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

रविवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३४.२ (१६.८), धुळे ३३.५ (१४.०), जळगाव ३५.० (१८.५), कोल्हापूर ३४.८ (१९.५), महाबळेश्वर २८.४ (१४.६), मालेगाव ३७.६ (२०.२), नाशिक ३२.६ (१८.७), निफाड ३२.१ (१६.०), सांगली ३५.७ (१८.४), सातारा ३४.४ (१६.८), सोलापूर ३७.८ (२२.०), सांताक्रूझ ३०.७ (२४.४), डहाणू ३१.७ (२३.४), रत्नागिरी ३२.२ (२२.७),

छत्रपती संभाजीनगर ३३.४ (२०.०), नांदेड ३५.८ (२२.०), परभणी ३७.० (२१.५), अकोला ३६.० (२१.५), अमरावती ३४.२ (२०.५), बुलडाणा ३४.५ (१८.५), ब्रह्मपुरी ३५.७ (२१.८) चंद्रपूर ३७.२ (२१.२), गडचिरोली ३५.० (१९.४), गोंदिया ३१.५ (१९.९), नागपूर ३१.६ (२१.१), वर्धा ३३.८ (२२.०), वाशीम ३७.० (१८.८), यवतमाळ ३९.५ (१९.५).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT